हेल्पलाईन क्रमांकही नागरिकांसाठी केले जाहीर..
अहमदनगर: अवैधरित्या सामाजिक प्रसारमाध्यमाचा उपयोग करुन मुले परस्पर दत्तकत्वास देणारे संदेश फेसबुक व व्हॉटस् अॅपवर प्रसारित होत आहेत तसेच काही ठिकाणी फॉरवर्ड केले जात आहेत. अशा प्रकारे कोविड अथवा इतर कोणत्याही कारणामुळे पालकांचा मृत्यू झाला असेल आणि बालकास कोणतेही नातेवाईक स्वीकारण्यास तयार नसतील तर अशा बालकांसंदर्भात जिल्हा महिला व बालविकास विभागाने दिलेल्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी एस. जी. पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
माहितीसाठी हेल्पलाईन क्रमांक- १०९८, तसेच सकाळी ८ ते रात्री ८ या कालावधीत ८३०८९९२२२२ ७४०००१५५१८ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
याशिवाय, अहमदनगर जिल्ह्यात बालसंरक्षणासाठी कार्यरत असलेल्या यंत्रणांचे संपर्क क्रमांक- श्री. सुधीर पाटील, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, अहमदनगर- ०२४१-२४३११७१, श्री. वैभव देशमुख, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी, ९९२१११२९११, श्री. सर्जेराव शिरसाट, संरक्षण अधिकारी, संस्थाबाह्य काळजी. ९९२१३०७३०२ आणि प्रवीण मुत्याल (सदस्य, बाल कल्याण समिती, अहमदनगर- ९०११०२६४८५) असे आहेत. ***

