shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भुकेने पोटात पडणारी आग माहितेय या गणेशाला ...! मोफत अन्नवाटप करत आहेत पद्मशाली सोशल फाऊंडेशनचे श्री .गणेश लक्षेट्टी ..!


प्रतिनिधी : आसावरी वायकर

नगर (दि. ८ ) : येथील गरिबीची जाण असणारा आणि गरिबीतुनच वर आलेला गणेश लक्षेट्टी . कित्येक वर्षापासून कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता गोरगरिबांना आणि अपंगांना मदत करतोय.
त्याला सहकार्य करतेय त्याची धर्मपत्नी शिवानी आणि परिवार.

.  श्री गणेश व सौ.शिवानी लक्षेट्टी

कोरोना सारख्या महामारीच्या काळात या जोडप्याने स्वतःच्या खर्चाने फूल न फूलाची पाकळी म्हणून दि.६ मे ते दि.१६ मे पर्यंत रोज दुपारी त्यांच्या परिवारामार्फत आणि पद्मशाली फाऊंडेशन मार्फत जेवण पार्सल स्वरूपात वाटप करीत आहेत . फाऊंडेशनचे सर्व कार्यकर्ते यासाठी विशेष परिश्रम घेत आहेत .

त्यांनी विनंती केलीय की, ज्यांना कुठेही गरजु व अपंग व्यक्ती दिसतील त्यांनी ९६ ०४ ३६ १० ६१ या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा. त्याठिकाणी जाऊन या गरजुंना व अपंग व्यक्तींना जेवण पार्सल दिले जाईल .

कोरोना रोगाचा प्रादुर्भाव वाढत असताना या आजाराने कित्येक घरे ओस पडलेली आहेत . अशा घरातील लोकांना गणेश लक्षेट्टी यांनी अन्न धान्य वाटप जेवण वाटप अशा विविध पद्धतीने मदत केली आहे .

मुक्या प्राण्यांच्या प्रेमापोटी त्यांनी जनावरांना हिरवा चारा उपलब्ध करून दिला आहे. समाजाप्रती असणारे प्रेम आणि सामाजिक बांधीलकी गणेश ला स्वस्थ बसू देत नाही.

समाजातील गरजु लोकांना जीवनावश्यक वस्तु मिळण्यासाठी शिवाजी नगर, कल्याण रोड येथील पद्मशाली सोशल फाऊंडेशन आणि त्याचे कार्यकर्ते अहोरात्र झटत आहेत.
close