मास्क एक सावधानी सांगणारा असाही एक रंगतदार कलाकार ..चित्रकार अनिल आनंदकर
प्रतिनिधी । संजय वायकर :-
नगर (दिः१८) : कोविड १९ विषाणूने संपूर्ण जगात थैमान घातलेले आहे . आपल्या भारत देशात तर कोरोनाची परिस्थिती चिंताजनक आहे .
भारत माझा देश आहे . सारे भारतीय माझे बांधव आहेत आणि म्हणूनच मी कोरोना नियमांचे पालन करणार असे म्हणत या कोरोना आजाराला घाबरून न जाता श्रीगोंदा येथील चित्रकार श्री .अनिल आनंदकर यांनी कोरोना विषाणू विरोधी जनजागृती रथ तयार केला आहे*.
अनिल यांनी प्रशासनाने सांगितलेल्या नियमांची माहितीच जनजागृती रथावर लिहिली आहे . हा रथ संपूर्ण नगर जिल्ह्यात फिरत आहे .
'आपले हात साबण व पाण्याने स्वच्छ धुवा.' '
हात स्वच्छ रहाण्यासाठी अल्कोहोलबेस सॅनिटायझरचा वापर करा '
शिंकताना व खोकताना आपल्या नाकावर व तोंडावर रूमाल धरा. '
हस्तांदोलन टाळा' .
'नाक व तोंडाला वारंवार स्पर्श करू नका'
'आपले डोळे वारंवार चोळू नका'.
कोविड १९ विषाणुचे संक्रमण होवु नये म्हणून नागरिकांनी सर्व प्रकारची काळजी घेण्याचे आवाहन श्री.अनिल आनंदकर यांनी केले आहे.
या जनजागृती रथाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे .

