C M S ग्रुपला आहे समाजाची जाण म्हणूनच त्यांनी सुरु केले अन्नदान ...!
प्रतिनिधी । आसावरी वायकर :
नगर (दि.१९ ) : येथील दरेवाडी CMS ग्रुप नं.3 यांच्या सहकार्याने व CMS अ.नगर परिवार यांच्या मार्फत सावेडी उपनगर विभागात जे कोरोना सेंटर हॉस्पिटल आहेत तिथे फूल न फूलाची पाकळी म्हणून रुग्णांच्या नातेवाईकांची सकाळची नाश्त्याची (अल्पोपहार) सोय करून दिली आहे,
प्रा.अशोक बेरड
लॉकडाऊन मूळे सध्या सर्व हॉटेल, दुकाने बंद असल्यामुळे पेशंटच्या नातेवाईकांची जेवण, नाष्टाची समस्या निर्माण होत आहे . परिणामी त्यांचे हाल होत आहेत. म्हणून CMS ग्रुप ने समाजाप्रती असणारी आस्था आणि प्रेम यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना सकाळच्या नाष्ट्याची सोय करण्याचे ठरविले .
तसेच नगर शहर भागातील जे कोणी मदतीसाठी येण्यास इच्छुक असतील त्यांनी खालील ठिकाणी संपर्क साधण्याचे आवाहन प्रा. श्री. अशोक बेरड यांनी केले आहे .
(वेळ :सकाळी 07 ते 09)
संपर्क :
आजिनाथ मोकाटे:8788723632
श्री.विजय कराळे:9921211515
श्री.संदीप नवसुपे:9422963035
प्रा.श्री.अशोक बेरड:8830359052

