shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अभिमानास्पद, शिकण्यासारखे व यातून महाराष्ट्र सरकारला एक मोलाचा संदेश - पै.राहूल चंद्रकांत धोत्रे (आंतरराष्ट्रीय खेळाडू)..!



पिंपरी चिंचवड:- हरियाणाच्या तब्ब्ल 18 जणांची टोकियो ऑलिम्पिक साठी भारताकडून निवड झाली...या सर्वांचे मी अभिनंदन करतो.

महाराष्ट्र सरकारला माझे म्हणणे आहे की, खेळाडूंना क्रिडा क्षेत्रात गालबोट लागणार नाही किंवा राज्य सरकारला गालबोट लागणार नाही.असे राज्य सरकारने आंतरराष्ट्रीय पातळीवर तयारी करणाऱ्या क्रिडापट्टूंना अत्यावश्यक सर्व सोयीसुविधा तसेच खेळाडूंचे नोकऱ्याचे प्रश्न असतील अशा अनेक गोष्टी हरियाणा राज्य सरकार कडून खेळाडूंना जलद गतीने मिळाल्या आणि याचा निकाल अखंड देशाला आज दिसत आहे. एका राज्याकडून 18 जणांची जगातील सर्वात मोठ्या यंदा होणाऱ्या "टोकियो ऑलिम्पिक" खेळासाठी निवड होणे ही खूप मोठी कौतुकास्पद बाब आहे.

यानिमित्ताने  महाराष्ट्र प्रशासनाला संदेश असा असेल की,   पैलवानांना त्यांच्या प्रश्नांची व इतर गरजांची पूर्तता करण्यासाठी प्रशासनाच्या उंबऱ्या भोवती हजारो फेऱ्या मारावे लागतात व त्यात तुम्ही खेळाडूंना हे  कागदपत्र आना  ते कागदपत्र आना असे बोलून कागदी घोड्याभोवती नेहमी नाचवता ही राज्यातील अत्यंत निराशजन्य बाब आहे.

 जर खेळाडूंना त्यांच्या गुणवत्तेच्या जोरावर जर खुराकापासून तर  इतर सर्व सोयी सुविधा हव्या तशा पुरवल्या तर  व इतर खेळाडूंचे व विशेषतः महिला खेळाडूंचे सर्व प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावले तर जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र नक्कीच घडेल..! पण महाराष्ट्रात असे होताना दिसत नाही.हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे.

हरियाणाच्या सर्व खेळाडूंना भारतातील तमाम बॉक्सिंग/ कुस्ती शौकिनांकडून खूप साऱ्या शुभेच्छा.. !
धन्यवाद, 

पै.राहूल चंद्रकांत धोत्रे ,
पिंपरी-चिंचवड, पुणे.
(आंतरराष्ट्रीय खेळाडू)
close