कोपरगाव । प्रतिनिधी :
कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन आम रजी.नं. 18/2021 कलम 174 सीआर. पी.सी.प्रमाणे
दिनांक 14/05/2021 रोजी दाखल असुन,सदर आम मधील मयत-सुवर्णा विजय उर्फ बंडु गवळी,रा.मढी खुर्द,ता.कोपरगाव हिचे व तिचा पती आरोपी विजय उर्फ बंडु आप्पासाहेब गवळी,रा.मढी खुर्द,ता.कोपरगाव
यांच्यात दिनांक 13/05/2021 रोजी 20.00 वा.सुमारास झालेल्या भांडणात आरोपीने मयताचे डोक्यावर मागील बाजुस काहीतरी टणक शस्त्राने मारुन जीवे ठार मारले आहे व त्यानंतर मृत शरीरावर काहीतरी ज्वालाग्रही पदार्थ टाकुन जाळण्याचा प्रयत्न केला. तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी तिच्या अंगावरील जळालेले
कपड्यांचे अवशेष लपवून ठेवले व तिच्या मृत शरीरावर नवीन कपडे घातले व मयताने आत्महत्या केल्याची
खोटी माहिती नातेवाईकांना देवुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. असे तपासात निष्पन् झाल्याने पोहेकॉ/190 अमरनाथ वैजीनाथ गवसने,नेम-कोपरगाव तालुका पो.स्टेशन यांच्या फिर्यादीवरुन कोपरगाव तालुका पोस्टे गुरनं 159/2021 कलम 302,201 भादवि प्रमाणे दिनांक 15/05/2021 रोजी दाखल करण्यात आलाआहे.
सदर गुन्ह्यातील आरोपी हा गुन्हा केल्यापासुन फरार होता. सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता वरीष्ठांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शनाने तपास सुरु होता.सदर आरोपीचे शोध कामी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, श्री दौलत जाधव यांच्या सुचनेप्रमाणे (1)पोहेकाँ/इरफान शेख (2)पोकॉ/864 आंबादास वाघ (3)पोकॉ/2459 रमेश झडे यांनी
तांत्रीक विश्लेषनाच्या आधारे आरोपी (1)विजय उर्फ बंडु आप्पासाहेब गवळी,वय-33 वर्षे,रा.हनुमान
मंदीराजवळ मढी खुर्द,ता,कोपरगाव यास लोणीकंद,ता.हवेली,जि.पुणे येथुन ताब्यात घेतले. आरोपीकडे गुन्ह्याबाबत विचारपुस करता त्याने गुन्हा केल्याची माहिती दिली. सदर आरोपीस मा.न्यायालयात हजर केलेअसता,मा.न्यायालयाने आरोपीस दिनांक 20/05/2021 पावेतो पोलीस कस्टडी रिमांड दिली आहे.
सदरची कौतुकास्पद कामगीरी मा.पोलीस अधिक्षक,श्री मनोज पाटील सो,मा.अपर पोलीस अधिक्षक सो दिपाली काळे मँडम, मा,उपविभागीय पोलीस अधिकारी,संगमनेर चार्ज शिर्डी,श्री राहुन मदने सो यांचे मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन येथील पोलीस निरीक्षक,दौलत जाधव,पोहेकॉ/ इरफान शेख,पोकॉ/आंबादास वाघ,पोकॉ/रमेश झडे व सायबर सेल कार्यालय, श्रीरामपुर येथील पोना/फुरखान शेख
यांनी केली आहे.

