बहुजन प्रतिपालक व बहुजन बहुजनांचा शाश्वत नेता स्व.राजीवजी सातव साहेब यांच्या राहिल्या फक्त आठवणी..!!
वासिम । प्रतिनिधी :
वडार समाज हा देश स्वातंत्र्यापासून देशाच्या विकासासाठी योगदानात अग्रेसर राहिला आहे. ज्या समाजाने स्वातंत्र्य पुर्व काळापासून गड, किल्ले,धरणे,रस्ते, रेल्वे पुल, रेल्वे लाईन,वाडे,घरे, बोगद्यांची निर्मिती,कच्चे अन्न शिजवून खाण्यासाठी पाटे , वरवंटा,उखळ आदी गोष्टींची निर्मिती केली, आजही करीत आहेत, परंतू या यंत्रयुगात त्यांची कामे हिरावली गेली आहेत.त्यांना ना आमदार आहे.. ना खासदार..!अशा उपेक्षित समाजाला न्याय मिळायलाच पाहिजे या उदात्त हेतूने केंद्र सरकार दिल्लीपर्यंत मोठ्या दिलदारपणा ने त्यांनी विषय हाताळले, व पुढेही न्याय मिळेपर्यंत मी सदैव वडार समाजाच्या पाठीशी राहिल असे अभिवचनही त्यांनीं दिले होते.परंतू केंद्रात सत्ता हातात नसल्यामुळे ते हताश झाले..! तरीही समाजाच्या नेत्यांना नेहमी विश्वास देत राहिले.
मार्गदर्शन करण्यासाठी खा. राजीवजी सातव यांची उपस्थिती..!
हा समाज खरोखर उपेक्षित आहे, यांना न्याय मिळायलाच पाहिजे, यासाठी दिल्ली पर्यंत वडार समाजाने मजल मारली पाहिजे. यासाठी त्यांनी अखेरपर्यंत प्रयत्न केले.
मा.मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना राजीवजी सातव यांनी दिलेल्या शिफारशीनुसार विविधमागण्या संदर्भात निवेदन देताना वडार समाज संघ, महाराष्ट्र राज्य पदाधिकारी..!
आदरणीय माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना वडार समाजाच्या विविध मागण्या संदर्भात वडार समाजाचे दुत म्हणून शिफारस केले व एका कार्यक्रमात समाजाला घरी बोलावून मार्ग दर्शन ही केले. त्याचप्रमाणे समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी थेट मुख्यमंत्री पय॔त वडार समाजाच्या शिष्टमंडळास घेऊन जावून २०० ब्राॅस दगड खाणीतून उत्खनन करून वहातूक करण्यासाठी वडार समाजाला राॅयल्टी माफीसाठी सहकार्य केले.
बहुजन समाजासाठी सदैव धडपडणारा नेता आज आम्हांला पोरके करून सोडुन गेले आहेत. यामुळे वडार समाज सध्या तरी पोरके झाले आहे. वडार समाजाचे अपरिमित नुकसान झाले आहे. ते कधीच भरुन न निघणारे आहे. अशा प्रकारचे शोक व्यक्त करून वडार समाज संघ, महाराष्ट्र राज्य व विदर्भ अध्यक्ष महादेव कुसाळकर सर यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.
वडार समाज संघ, महाराष्ट्र राज्य, सर्व पदाधिकारी व विदर्भ अध्यक्ष महादेव कुसाळकर सर यांचे सोबत मागण्यांसंदर्भात चर्चा करताना खा.राजीवजी सातव
विदर्भ अध्यक्ष महादेव कुसाळकर सर खा. राजीव जी सातव यांच्या बरोबर समाजाच्या मागण्या संदर्भात चर्चा करतानाा.!!
"धन्य होते तुम्ही साहेब तुमचे कार्य तुमच्या कार्याला माझा सलाम "
महादेव कुसाळकर सर विदर्भ अध्यक्ष..!
**********************************

