shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आळंदी मध्ये हातगाडीवर पतीसह झोपलेल्या महिलेचा विनयभंग ; आरोपीला अटक..!

पिंपरी चिंचवड:- हातगाडीवर पतीसह झोपलेल्या महिलेचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. दांडेकर महाराज मंदिर, देवाची आळंदी याठिकाणी शुक्रवारी (दि.21) रात्री सव्वा एकच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी आरोपीला ताब्यात घेतले आहे. 

अनंत श्रीधर थोरवे (वय 36, रा. आळंदी, मुळगाव – सिंदखेडराजा, बुलढाणा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पिडित महिलेनं आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडित महिला त्यांच्या ओळखीच्या महिलेनं लावलेल्या हातगाडीवर पतीसह झोपल्या होत्या. यावेळी आलेल्या आरोपीने झोपलेल्या महिलेचा विनयभंग केला असे, फिर्यादीत म्हटले आहे.
close