प्रतिनिधी । संजय वायकर :
अ.नगर (दि.२७) : नगर तालुक्यातील हातवळण व मठपिंप्री येथे *'गाव तेथे लसीकरण' मोहिम यशस्वी करण्यासाठी आज दिं २७/०५/२१ रोजी वाळकी गटाचे कार्यसम्राट मा. जि. प. सदस्य बाळासाहेब हराळ पाटील, व नगर पं समितीचे मा. उपसभापती रवींद्र भापकर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.
हातवळण चे श्री .बाळासाहेब चेमटे,नाना जाधव,बाळासाहेब मेटे,दिलीप लाळगे,पंढरीनाथ नवसुपे,तसेच मठपिंप्री चे हौसराव नवसुपे,संजय बोरकर,चौधरी सर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करून लसीकरण करून घेतले. वाळकी गटाचे कार्यसम्राट मा. जि. प. सदस्य बाळासाहेब हराळ व नगर पं समितीचे मा. उपसभापती रविंद्र भापकर यांच्या सुयोग्य नियोजनातून संपूर्ण वाळकी गट परिसरातील लसीकरण यशस्वीरित्या पार पडत असून नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
लसीकरण यशस्वीतेसाठी वैद्यकीय अधिकारी डॉ.ससाणे मॕडम व आरोग्य कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.
'नागरिकांनी संयम पाळावा' -
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांना प्राण गमवावे लागल्याने सध्या लसीकरण केंद्रावर प्रचंड गर्दी होत आहे. रुईछत्तीसी केंद्रा अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक गावातील गावपुढाऱ्यांकडून लसीकरणासाठी आग्रह धरला जात आहे. तर दुसरीकडे लसींचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने लसी मिळण्यास अडचणी येत आहेत.
रोटेशन पद्धतीने सर्व गावांना लस मिळणार असून परिसरातील गाव पुढाऱ्यांनी तसेच नागरिकांनी संयम पाळून सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले.

