नगर । प्रतिनिधी (शिवा म्हस्के):
संपर्क ९६८९५९२२९५
नगर तालुक्यातील मेहकरी आरोग्य उपकेंद्राच्या अंतर्गत खांडके गावात बुधवार (दि.१२) में रोजी मेहेकरीचे उपकेंद्राच्या वैद्यकीय अधिकारी पवार मॅडम, गळगें मॅडम, यांच्या उपस्थितीमध्ये गावातील नागरिकांना पहिल्या व दुसऱ्या डोसचे लसिकरण देण्यात आले. यामध्ये गावातील ५० ग्रामस्थांनी लस घेतली.
लसीसकरण कँप यशस्वी होण्यासाठी खांडके गावचे सरपंच पोपटराव चेमटे, उपसरपंच जितेंद्र ठोंबे, प्रशाकीय अधिकारी कर्मचारी पर्यवेक्षक बडे साहेब, ग्रामसेवक गरजे भाऊसाहेब, डाटा ऑपरेटर महादेव कापसे, ग्राम रोजगार सेवक भगवान ठोंबे, आशा सेविका नीलम पवार, अंगणवाडी सेविका सावित्राबाई कांबळे चंदा आढागळे मदतनीस आशा चेमटे मनीषा टांगळ त्याचप्रमाणे नगर तालुका पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक लबडे साहेब, पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोकराव मरकड साहेब, गावातील ग्रामस्थ तसेच आदि मान्यवर उपस्थित होते.

