shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

खा.राजीव सातव यांचे निधन,असा नेता होणे नाही - खासदार हेमंत पाटील..!!

हिंगोली / प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख)

दि.१६,हिंगोली जिल्ह्याचे नाव अत्यंत कमी वयात राष्ट्रीय पातळीवर नेऊन उंचवणारे तरुण तडफदार नेतृत्व राज्यसभेचे खासदार ऍड.राजीव सातव यांच्या निधनामुळे हिंगोली जिल्हा आणि महाराष्ट्राचे भरून न निघणारे नुकसान झाले आहे. खरे पाहता हे त्यांचे जाण्याचे वय नव्हते. देशातील, राज्यातील युवकांची  आशा उंचवणरा नेता राज्याला गमवावा लागणे ही खूपच दुःखद घटना आहे. पंचायत समिती सदस्य ,जिल्हा परिषद सदस्य,आमदार, खासदार, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अशी विविध  पदे त्यांनी भूषवून जनतेची सेवा केली आहे.त्यांचे जाणे मनाला चटका लावून गेले.त्यांच्या परिवाराला या दुःखातून सावरण्याची ईश्वर शक्ती प्रदान करो.



👆हिंगोली चे खासदार हेमंत पाटील यांची प्रतिक्रिया


जनसामान्यांच्या मनात त्यांनी निर्माण केलेले स्थान सदैव अढळ  राहील.खासदार राजीवजी सातव यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

close