shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

संगमनेर -संगमनेर मध्ये विशिष्ट जमावाचा पोलिस कर्मचाऱ्यांवर हल्ला...!

संगमनेर - संगमनेर मध्ये विशिष्ट जमावाचा पोलिस कर्मचाऱ्यांवर हल्ला..!

संगमनेर । प्रतिनिधी : ऋषिकेश जगताप.
संगमनेर मध्ये दिल्ली नाका परिसरात पोलिस कर्मचाऱ्यांवर हल्ला व या हल्ल्यात पोलीस कर्मचारी गंभीर रित्या जखमी झाले आहे. 

कायदा व्यवस्थेचा प्रश्न हा आता निर्माण झाला आहे राज्याचे, महसूल मंत्री , व संगमनेर चे आमदार, बाळासाहेब थोरात, यांच्या मतदार संघातील हे  शहर आहे संचार बंदी च्या काळात पोलिसांवर झालेल्या हल्ल्यात दगडफेक केली गेली आहे व संचार बंदीचे उल्लंघन करून २००, जणांनी एकाच ठिकाणी जमा केला होता. 


संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक , राहुल मदने, यांनी पत्रकारांशी वार्तालाप करताना सांगितले की पोलिसांवर झालेला हल्ला अतिशय निंदनीय आहे. पोलिसांवर झालेल्या हल्ल्यात कोणाचीही गय केली जाणार नाही व सगळ्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे. अशी माहिती संगमनेरचे उपअधीक्षक , राहुल मदने, यांनी दिली आहे.
close