छोटा राजनचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची बातमी ऑल इंडिया रेडिओ या सरकारी वृत्तसेवेनं दिली होती.मात्र आता तो जिवंत असल्याची माहिती समोर आली आहे.
गँगस्टर छोटा राजनला कोरोनाची लागण झाल्यानंतर उपचारासाठी दिल्लीतल्या एम्समध्ये दाखल करण्यात आले असून, मात्र उपचार करताना त्याचा मृत्यू झाल्याची बातमी काही वेळापूर्वी सर्वत्र पसरली होती.
मात्र राजन यांच्या मृत्यूचे वृत्त खोटे असून छोटा राजन अजून जिवंत असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे एम्स (AIIMS) चे जनसंपर्क अधिकारी बी. एन. आचार्य यांनी दिली आहे.
कोण आहे छोटा राजन ? – छोटा राजन ऊर्फ नाना, याचं खरं नाव राजन सदाशिव निखलजे असं आहे. तो सुरुवातीला अंडरवर्ल्ड डॉन आणि मुंबई बॉम्ब हल्ल्याचा आरोपी दाऊद इब्राहिमचा जवळचा साथीदार होता.
मात्र, कालांतराने दोघांमध्ये टोकाचं शत्रूत्व निर्माण झालं. छोटा राजनने मुंबईतील एका चित्रपटगृहाबाहेर ब्लॅक तिकीट विकण्याचं काम सुरु केलं.
त्यानंतर त्याची भेट राजन नायर ऊर्फ बडा राजन याच्याशी भेट झाली. बडा राजनकडून त्याने चुकीच्या आणि गुन्हेगारीच्या अनेक गोष्टी शिकल्या.
येथूनच त्याच्या गुन्हेगारी विश्वातील कट-कारस्थानाला सुरुवात झाली. तो दारुची तस्करी करु लागला. बडा राजनच्या मृत्यूनंतर गुन्हेगारी विश्वात तो छोटा राजन म्हणून नावरुपाला आला.
त्याच्यावर खंडनी, हत्येची, तस्करीचे अनेक मोठमोठे आरोप आहेत.छोटा राजन विरोधात 17 हत्या आणि हत्येच्या प्रयत्नाचे गुन्हेल दाखल आहेत. तो कित्येक वर्षांपासून फरार होता. मात्र, 2015 साली त्याला इंडोनेशियातून अटक करण्यात आली.

