shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बाजार समितीचे खरेदी विक्री व्यवहार सुरू करण्याची मागणी - बाजार समिती नगर सभापती अभिलाष घिंगे


नगर । प्रतिनिधी (शिवा म्हस्के):
जिल्हाधिकारी साहेब आदेशामुळे नगर बाजार समितीमधील सर्व व्यवहार बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे मोठे नुकसान होत असुन भाजीपाला तरी व्यवहार सुरू करण्याची मागणी सभिपती अभिलाष हिंगे यांनी जिल्हा अधिकारी यांच्या कडे केली आहे.


या संदर्भात जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या कोरोना  संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी सर्व बाजार समितीमधील शेतमालाचे खरेदी विक्री व्यवहार बंद करण्यात आले आहेत.यामुळे नगर बाजार समितीच्या मुख्य आवारातील फळे ,भाजीपाला, अन्नधान्य व इतर व्यवसाय बंद ठेवण्यात आले आहेत.सध्या वादळी वाराव पावसामुळे शेतकर्यांचे शेतीमालाचे मोठे नुकसान होतं आहे. बाजार समितीत बंद असल्याने शेतकऱ्यांचा भाजीपाला शेतातच खराब होत असुन यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे.

सध्या खरीप हंगाम तोंडावर आलेला असताना शेतकऱ्यांना आपला शेतीमाल विक्री करून बियाणे ,खते, औषधे शेती, अवजारे,वेळेत,मिळणे गरजेचे आहे. या मुळे बाजार समितीच्या मुख्य आवारातील फळे, भाजीपाला व भुसार माल तसेच नेप्ती उपबाजारातील फळे, भाजीपाला व कांदा व्यवहार सुरू केल्यास शेतकर्याच्या शेतमालाची विक्री होईल.आलेल्या पैशातुन शेतकरी खंत बियाणे शेती पुरक आवाजारे यांची खरेदी करतील.कोरोना संदर्भातील  सर्व ‌नियमाचे पालन करुन वेळेची मर्यादा घालून देऊन बाजार समितील खरेदी विक्रीचे व्यवहार सुरू करण्याची मागणी बाजार समिती सभापती अभिलाष घिंगे यांनी निवेदन देऊन केली आहे.
close