shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

करमाळा पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांची चोरट्या दारू वाहतूकीवर धडाकेबाज कारवाई...!


प्रतिनिधी । सुर्यकांत होनप :-

करमाळा दिनांक ( 20 ) :-
करमाळा दि.२०/५/२०२१ रोजी करमाळा पोलीस ठाणे कडील पोलीस हेडकॉन्स्टेबल देवकर, पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत ढवळे,सिद्धेश्वर लोंढे,तोफिक काझी,हनुमंत गवळी असे टेंभुर्णी ते अहमदनगर जाणारे हायवे रोड  वरती पेट्रोलिंग करत असताना बातमीदार  मार्फत  त्यांना माहिती मिळाली की एक इसम पांढऱ्या रंगाची बोलेरो गाडीमधून दारुच्या बाटल्या घेऊन जात  आहे. लागलीच त्यांनी सापळा रचून सदर गाडीला टेंभुर्णी ते अहमदनगर जाणारे हायवे रोड वरती नालबंद मंगल कार्यालयाजवळ पकडले.



सदर गाडी चेक केले असता सदर गाडीमध्ये निलेश बाबासाहेब  हंगे राहणार सोनारी तालुका परंडा जिल्हा उस्मानाबाद व देशी दारू संत्रा कंपनीचे दारूचे बॉक्स आढळून आले.

अशाप्रकारे देशी दारू संत्रा कंपनी च्या 180 मिली च्या 3264 सीलबंद बाटल्या व एक महिंद्रा बोलेरो कंपनीची चार चाकी गाडी तिचा आरटीओ नंबर एम एच 25 आर 8142 असा 7,09,728/- रुपये किमतीचा मुद्देमाल प्रोव्हीशन  गुन्ह्याच्या कामी जप्त करण्यात आला. 

 सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक मॅडम तेजस्वी सातपुते,अप्पर पोलीस अधीक्षक झेंडे साहेब,उपविभागीय पोलिस अधिकारी डॉक्टर विशाल हिरे साहेब,पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा पोलीस ठाणे कडील डीबी पथकाने केली आहे.

सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली   पोलीस हेडकॉन्स्टेबल संतोष देवकर  करत आहेत.
close