नगर प्रतिनिधी (शिवा म्हस्के)
नगर तालुक्यातील टाकळी काझी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून मांडवे येथे पंचायत समितीचे मा.सभापती इंजि.प्रविण कोकाटे यांच्या नियोजनातून वय वर्षं 60 वरील नागरिकांसाठी लसीकरण कॅम्प आयोजित करण्यात आला होता. कॅम्पचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी आरोग्य केंद्र टाकळी काझीचे वैद्यकीय अधिकारी डॉ.वाघ मॅडम,LHV देठे परिचारिका,वाघमारे भाऊसाहेब, बिडवे सिस्टर, हिवताप अधिकारी रायपेल्ली हे उपस्थित होते.
या वेळी मांडवे गावांचे सरपंच सुभाष निमसे यांनी चांगले व्यवस्थापन केल्यामुळे लसीकरण अतिशय शांततेत पार पडले.हा कॅम्प यशस्वी होण्यासाठी उपसरपंच संजय निमसे,चेअरमन पांडुरंग निमसे,ग्रा.पं. सदस्य शामराव निमसे सर,सोसायटी संचालक डॉ. दत्तात्रय निक्रड,विलासराव निमसे,अनिल निमसे,मुख्याध्यापक महान्डूळे सर,ग्रामसेवक देहाडे भाऊसाहेब,आशा गटप्रवर्तक साठे मॅडम,आशा सेविका निमसे ,गांगर्डे ,अंगणवाडी सेविका उकिरडे ,शिक्षक वर्ग व पंचायत समितीचे आरोग्य विभाग कर्मचारी आदींनी प्रयत्न केले.

