shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचे वेतन कपात करू नये-महाराष्ट्र राज्य हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य विभागीय शाखा अकोला यांची मागणी..!


महाराष्ट्र राज्य हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य विभागीय शाखा अकोला यांची मागणी

अमरावती - सतत दीड वर्षांपासून अत्यावश्यक सेवेतील अधिकारी व कर्मचारी आपल्या जीवाची  पर्वा न करता कोरोना महामारी मध्ये कर्तव्य पार पाडत आहे, कित्येक अधिकारी कर्मचारी यांनी कर्तव्य बजावत असतांना,कोरोना रोगाची लागण झाली व आपला जीव सुद्धा गमवावा लागला. 
       राहुल आटोळे

आणि पुन्हा त्यातच मा. मुख्यमंत्री महोदयांनी माहे मे च्या वेतनातून एक,दोन दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये देण्याबाबत शासन निर्णय काढला आहे, त्यांच्या ह्या निर्णयाचे आम्ही सर्व कर्मचारी स्वागत करतो, परंतु अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी जसे आरोग्य, पोलीस, व इतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी यांचे वेतन कपात न करण्याचे मुख्यमंत्री महोदयांना आवाहन केले आहे. 

उलट जे कर्मचारी,अधिकारी  आपल्या जीवाची पर्वा न करता सतत कोरोना महामारी मध्ये आपले कर्तव्य पार पाडीत आहे अश्या कर्मचाऱ्यांना बक्षीस म्हणून आगाऊ वेतनवाढ,प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा, व या सर्व कोविड वॉरीयर्सचा सन्मान म्हणून 1 नोव्हेंबर 2005 नंतर शासन सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी.

 अशी मागणी संघटनेचे विभागीय अध्यक्ष श्री.राहुल आटोळे,विभागीय कार्याध्यक्ष श्री. विनय शेलुरे,विभागीय सरचिटणीस श्री.मंगेश मदनकर,विभागीय सचिव ज्ञानोबा अरलवाड, कोषाध्यक्ष श्री.राहुल भोसले व सर्व पदाधिकारी राज्य हिवताप निर्मुलन कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य विभागीय शाखा अकोला यांनी केली आहे.
close