राजेश बाष्टे । अलिबाग प्रतिनिधी :-
दोन वर्षापूर्वी मा. शरदचंद्रजी पवार साहेब आणि शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.उध्दवजी ठाकरे साहेब यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेली महाविकास आघाडी व आघाडीचे सरकार तीन पक्ष मिळून शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वात राज्यावर कोरोना, निसर्गवादळ व अवकाळी पाऊस अशी एक ना अनेक संकटे येऊनही समर्थपणे राज्याच्या कारभार चालवित आहेत नेहमीच जनसामान्यांचा प्रथम विचार करून विकासाला चालना देण्याचे काम आघाडी सरकार मधील प्रत्येक आमदार जोमाने काम करीत आहेत त्यात उल्लेखनीय बाब म्हणजे अलिबाग मुरुड विधानसभेचे मा.आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्याकडून होत असलेला विकास कामांचा झंजावात पहाता विरोधकांच्या पोटात पोटशूळ उठल्यासारखे झाले आहे.
विरोधकांनी गेली अनेक वर्ष भेटेल त्या पक्षाबरोबर साटेलोटे जुळवून जिल्हा परिषदेची सत्ता ताब्यात ठेवली पण विकास कामे शून्य मा. महेंद्रशेठ दळवी यांनी येथील आरोग्य, रस्ते, पाणी योजना, उमटे धरणाचा गाळ काढणे, युवकांना रोजगार देऊन ग्रामिण भागात आघाडी सरकारच्या योजना तसे नाव्हाशेवा पूल रस्ता, तसेच अलिबाग मध्ये मेडीकल कॉलेज, करोना माहामारी सारख्या प्रसंगात गोरगरीब जनतेच्या पाठीशी ठामपणे उभे राहून लोकांना सहकार्य करत आहेत ज्यासाठी येथील जनता पंन्नास वर्षे प्रतीक्षेत होती पण माननीय दळवी साहेबांन मुळेच हि सर्व कामे सुरू झाली. जि.प.च्या सत्तेची खुर्ची उबवत स्वतःचा विकास करण्यातच मशगुळ असलेले विरोधक आता गेल्या दोन वर्षात सर्व संकटांचा मुकाबला करून मा.आमदार महेंद्रशेठ दळवी यांचा विकास कामांचा झपाटा पाहुन निष्र्पभ झाले आहेत.
मा. खासदार सुनील तटकरे साहेब पालकमंत्री मा. आदितीताई तटकरे हे आमदार साहेबांच्या खांद्याला खांदा लावून विकास कामांची पूर्तता होण्यासाठी सोबत असतात हे पाहून कुठेतरी विरोधकांना पोटशूळ उठला आहे. आता जिल्हा परिषद निसटते की काय अशी भीती त्यांना वाटू लागलीय या वर उपाय म्हणून त्यांनी नवीन फंडा शोधलाय काय ? तर म्हणे त्यांच्या लिमिटेड पत्रकारितेतून की मुखपत्रातून दिनांक २८/५/२०२१ रोजी कृषिवल या मुखपत्रातून कार्यक्षम आमदार मा.महेंद्र शेठ दळवी यांच्या विरोधात खोट्या बातम्या देत आघाडी सरकार मधील घटक पक्षांमध्ये तेढ निर्माण करण्याचा एक कलमी कार्यक्रम विरोधकांनी हाती घेतला आहे परंतु जनता सुज्ञ आहे.
यामुळेच गेली अनेक वर्षाची माजी निष्क्रिय आमदारांची मिरासदारी संपवून एक कार्यतत्पर विकास पुरुष आमदार मा महेंद्रशेठ दळवी यांच्यावर विश्वास ठेवून अलिबाग - मुरुड चे विधानसभेचे प्रतिनिधित्व ३४७०० मतांनी अलिबाग मुरुड रोहा च्या जनतेनी त्यांच्या हाती नेतृत्व दिले आणि त्यांच्या नेतृत्वाखाली अलिबाग तालुक्यातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व शिवसैनिक जोमाने कार्यरत आहे.
एक विकास कामातील सक्रिय व्यक्तिमत्व अलिबाग मुरुड च्या नागरिकांना गवसले आहे म्हणून जनतेमध्ये व अलिबाग मुरुड रोहा तालुक्यातील शिवसेनेमध्ये समाधानाचा सुर आहे.
राजा केणी
शिवसेना अलिबाग तालुका प्रमुख

