प्रतिनिधी-विशाल लोंढे
कोपरगाव - कोपरगाव तालुक्याला थोर संतांची परंपरा आहे.या तालुक्याचे देशभर नावलौकिक आहे. परंतू यांचे भान काहि शैक्षणिक संस्थांना नाही.म्हणूनच कोपरगाव तालुक्यातील एका नामांकित आध्यात्मिक व शिक्षण संस्थेचे कार्य महाराष्ट्रात प्रसिध्द असल्याने पालक आपल्या मुलांना चांगले संस्कार व्हावे यासाठी त्या शैक्षणिक संस्थेत शिक्षणासाठी पाठवतात परंतु त्याच शैक्षणिक संस्थेच्या व्यवस्थापकाने शैक्षणिक ग्रुपवर असभ्य व अश्लील चिञफित टाकल्याची घटना समोर आल्याने त्या ग्रुप मधील शिक्षक व महिला शिक्षकांनी अशा या नालायक व्यवस्थापक बाबत तीव्र नाराजी व्यक्त करुन संताप व्यक्त केला आहेत.
या प्रकरणाबाबत बाहेर कोणी वाच्यता केली तर नोकरी गमवावी लागेल अशी धमकी देखील सदर शिक्षण संस्था चालकांनी दिली असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.
सोशल मिडीयामुळे काही गोष्टी चांगले होतात तर काहींचे नुकसान होत आहे. सोशल मिडीयाचा वापर चांगल्या कामासाठीच करा असे आवाहन देखील अनेकवेळा प्रशासनाने करुन देखील सदर विषयाला जाणूनबुजून दुर्लक्ष देखील केले जाते आहे. व्यवसाय, व्यवसायची माहीती कर्मचारी असो किंवा नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी सोशल मिडीयाच्या ग्रुपवर टाकली की अवघ्या काही क्षणात सदरची माहिती प्रत्येकाला मिळत असल्याने काम करणे सोपे जाते.
कोपरगाव येथील एका नामांकित शैक्षणिक संस्थेने आपले शैक्षणिक नियोजनासाठी ग्रुप तयार करण्यात आला सदर ग्रुपमध्ये प्राचार्य, शिक्षक, शैक्षणिक संस्थेचे प्रमुख देखील त्या ग्रुपमध्ये आहेत. याच संस्थेच्या धाक नसलेल्या व्यवस्थापकाने शैक्षणिक माहिती ऐवजी चक्क अनेक प्रकारचे अश्लील चिञफित टाकून अनेकांना लज्जा होईल असे वर्तन सदर या नालायक व्यवस्थापकाने केले आहे.
आपल्या देशात महिलांना सन्मान देण्याची हजारो वर्षांपासून ची परंपरा आहे.परंतू अलीकडे असे होतांना दिसत नाही हि फार मोठी शोकांतिका आहे.
महिलेचा सन्मान व समाजात आदर्श व्यक्तीमत्व बनवायचे काम हे शिक्षक करत असतात आणि त्याच शिक्षण संस्थेमध्ये कारभार चालवणार्या अधिकाऱ्यांकडूनच असा प्रकार होणे म्हणजे कुठे तरी कुंपणच शेत खात आहे. अशी परिस्थिती समाजात जाणवत आहे.
तालुक्यातील नावाजलेले शिक्षण व धार्मिक संस्थेच्या व्यवस्थापकाकडुन अशी चूक होणे कुणालाच अपेक्षित नसताना देखील असा प्रकार समोर येणे म्हणजे समाजातील महिलेच्या सन्मानाला कुठेतरी काळिमा फासणारे कृत्य करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कोणाचेही धाक नसल्याचे निष्पन्न होत आहे. गुन्हा करून देखील आपल्या अधिकाराचा गैरवापर करून गुन्हा लपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल होईल का..?
शैक्षणिक संस्था या चांगले संस्कार व्हावेत यासाठी निर्माण केले जातात.परंतू अनेक संस्था मधील पदाधिकारी हे महिलांच्या असहायतेचा फायदा घेत, महीला शिक्षिका व विद्यार्थीनींचे सर्रासपणे शोषण करतानाचे आढळून येते. यावर शासनाने वचक ठेवला पाहिजे.यासाठी महिला शिक्षिका, सामान्य महिला संघटना मागणी करत आहेत.
शैक्षणिक संस्थेत काम करणाऱ्यांवर घटनेनुसार नियम सर्वांना सारखेच असते. परंतु सदरचा व्यवस्थापक
काहींच्या खास मर्जितील असल्याने सदरचा प्रकार हा तेरी भी चुप मेरी.. अशा म्हणीप्रमाणे झाले आहे. सदरच्या व्यक्तीवर कारवाई करण्यापेक्षा त्या प्रकरणावर पांघरुन कशा पध्दतीने घालता येईल असे नियोजन शैक्षणिक संस्थेच्या चालकांकडुन होत असताना दिसत आहे. सदर व्यक्तीवर कारवाई न झाल्यास अनेकांच्या विश्वासाला तडा जाणार आहे. सदरच्या व्हाट्सएपच्या प्रकरणात संस्था चालकांनी योग्य निर्णय घेऊन संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली तर या संस्थेवर सामान्य जनतेचा विश्वास राहिल. या साठी चांगला निर्णय देऊन सामान्य नागरिकांना दिलासा देण्याची आवश्यकता आहे.

