प्रतिनिधी । संतोष वायकर:
सोलापूर (दि.१७): शहरातील किराणा , भाजी- फळे, मांसविक्रीची दुकाने 15 मे पासून सकाळी 7 ते 11 या वेळेत सुरू ठेवता येतील असे आदेश महापालिका आयुक्त पी.शिवशंकर यांनी दिले आहेत . इतर सर्व दुकाने 1 जूनपर्यंत बंद असतील. शहरात प्रवेश करायचा असेल तर कोरोना चाचणीचा अहवाल दाखविणे बंधनकारक असेल.
पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शहरातील कोरोना स्थितिचा आढावा घेतला. त्यांनी शहरातील दुकाने व घरपोच सेवा सुरु राहणार असल्याचे आदेश दिले होते . त्यानुसार पालिका आयुक्त पी.शिवशंकर यांनी शुक्रवारी रात्री उशिरा आदेश जारी केले.
महापालिका हद्दीत प्रवेश तेव्हाच दिला जाईल जेव्हा प्रवासी मागील 48 तासांपूर्वी केलेला आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल दाखवतील .
परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांना हा नियम अनिवार्य असेल असे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी सांगितले. ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या नागरिकांना ही या नियमांचे पालन करावे लागेल.

