प्रतिनिधी । मोहन शेगर :-
सोनंई :-सोनई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे यांना दि 15 मे रोजी मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे चांदा ता .नेवासा शिवारात घोडेगाव ते कुकाणा रोडच्या पुलावर अशोक ऊत्तम फुलमाळी रा .शास्री नगर चांदा हा इसम गावठी कट्यासह या ठिकाणी फिरत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याच्या आधारे सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे व त्यांचे सहकारी यांनी पंचासह मिळालेल्या माहितीनुसार चांदा शिवारात रात्री 21.30 वाजता छापा टाकुन एक गावठी कट्यासह दोन जिवंत काडतुस ,एक विना नंबरच्या होंडा स्कुटर सह मिळुन आला .सोनई पोलीस ठाण्याचे पोना .शिवाजी माने यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन गु.र.नं.१६०/२०२१भारतीय शस्र अधिनियम १९५९ चे कलम ३,७/२५ महा .पो अधि का कलम १३५ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे .वरील आरोपी विरूध्द १) सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा र .नं .१६१/२०१८भा.द.वि क.३२४,३२३ ,५०४,५०६ आर्म अँक्ट ४/२५ प्रमाणे २ ).गु.र.नं २६४/२०१९भा.द.वि .कलम ३२७,३२४,५०४,५०६ ,सह आर्म अँक्ट ३/२५ प्रमाणे ३) गुन्हा र.नं.३०/२०२१भा.द.वि.कलम ३२४,३२३ ,५०४,५०६ ,प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
पोलीस अधीक्षक मनोज पाटील अहमदनगर ,डॉ. श्रीमती दिपाली काळे मँडम अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर ,व उप.विभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे यांचे मार्गदर्शनाखाली सोनई पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे ,सहा. फौजदार संजय चव्हाण ,पो.हे.काँ .दत्तात्रय गावडे ,पो.ना .शिवाजी माने ,पो.काँ.विठ्ठल थोरात ,पो.काँ.बाबा वाघमोडे ,पो.काँ.आदिनाथ मुळे ,पो.काँ.रवी गर्जे ,पो.काँ .गोरख जावळे व चालक पो.हे.काँ .मारुती पवार यांनी ही कामगिरी बजावली .

