डेंगू सारख्या कीटकजन्य आजाराला आळा घालण्यासाठी आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळण्याचे महत्व वैद्यकीय अधिकारी डॉ.श्री अंकुश माकोडे आरोग्य कर्मचारी श्री.आर.टी.आटोळे व श्री.ए.के.जाधव यांनी सांगितले.तसेच वेन्ड पाईपला जाळी / कापड बांधून गावातील सर्वं वेन्ड पाईपला जाळी बांधण्याचे महत्व सांगण्यात आले.
कोरोना परिस्थितीचा विचार करून सर्वं नियमावली चे पालन करून कुऱ्हा येथे डेंगू दिवस साजरा करण्यात आला.डेंगू दिन साजरा करतांना प्रा.आ.केंद्र कुऱ्हाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.माकोडे सर, आरोग्य कर्मचारी श्री.आर.टी. आटोळे व श्री.ए.के.जाधव हत्तीरोग कर्मचारी श्री.आर.शेंगुळे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

