shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सुरेगावातील मैत्री प्रतिष्ठान चा गरजूना मदतीचा हात..!


प्रतिनिधी । विशाल लोंढे :-

सुरेगाव :-एकीकडे महामारीची भीती, तर दुसरीकडे खायचे काय?या प्रश्नाने व मनाने सर्वच नागरिक हबकून गेले आहे मात्र तु भिऊ नकोस  आम्ही तुमच्या पाठीशी आहोत या भावनेतून ऐन संकटकाळात सुरेगावातील मैत्री प्रतिष्ठान च्या मदतीने लोकांना धीर देयला आणि जगायला शिकवत आहे. या महामारीमध्ये गरिबांसाठी अश्या पद्धतीची मदत लाखमोलाची ठरत आहे.

सुरेगाव गावासह परिसरातील कोळपेवाडी, शहाजापूर,कोळगाव थडी, हांडेवाडी, येथील गरजू कुटुंबाना या प्रतिष्ठानच्या वतीने किराणा मालाचे मोफत वाटप करण्यात येत आहे.सध्या कोरोनाच्या पहिल्या टप्प्याप्रमाणे दुसऱ्या टप्याला देखील लोक त्रस्त झाले असताना सगळीकडे शासनाच्या वतीने लॉकडाऊन लावण्यात आलेला आहे यामुळे सर्वच गरिबांचा रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर आला असून कुटुंबाला सांभाळायचे कसे असा मोठा प्रश्न कुटुंब प्रमुखांवर उभा राहिलेला आहे.

अनेक कुटुंबाना दररोज चा चरितार्थ चालवायचा तरी कसा? याची चिंता पडलेली आहे अश्या परिस्थितीत गोरगरिबांना मदतीचा हात म्हणून सुरेगाव मधील अंबिकानगर येथील तरुण एकत्र येत मैत्री प्रतिष्ठान तर्फे गरिबांना बाजरी. गहू,तांदूळ,
साखर, तेल, चहा पावडर,मिरची पावडर, पोहे, गूळ, मीठ आदी वस्तूंच्या किटचे वाटप करत आहे.
यंदाच्या परिस्थितीत दररोज चा लागणारा किराणा माल मोफत वाटप केल्याने गरजू बांधवाना मोठा आधार मिळाला आहे.

या ग्रुप तर्फे आता पर्यंत 60 कुटुंबाना किट वाटप करण्यात आले असून यापुढेही ते किट मध्ये अजून साहित्यांची भर करून मदत करणार असल्याचे आमच्या प्रतिनिधीस सांगितले.

मात्र 10 दिवसातून किटचे वाटप चालू असताना त्यांनी वाटप करतानाचे कोणतेही फोटो काढलेले नाही किंवा आमच्या प्रतिनिधीस काढू दिलेले नाही. केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी आम्ही हे कार्य करत नसून गोरगरिबांच्या कुटुंबातील एक सदस्य होऊन मदत करत असल्याचे त्यांनी सांगितले तरी या कोणाला काही मदत देयची किंवा आपल्या परिसरात एखादा गरजू  असेल तर 9130879000, 9579730172 या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन केले आहे.
close