नगर तालुका पोलिसांची कामगिरी
क्राईम रिपोर्टर
नगर । प्रतिनिधी (शिवा म्हस्के):
पीक विमा मिळवून देतो असे सांगून बनावट पावत्या द्वारे शेतकऱ्यांची फसवणूक करून दोन वर्षांपासून फरार आरोपीस नगर तालुका पोलिसांनी अटक केली.
सदर गुन्हा 13/3/2019 रोजी नगर तालुका पो.ठाणे गुन्हा रं/न. 131/2019 भादवी कलम 406,468 प्रमाणे दाखल होता तेव्हापासून आरोपी नामे दीपक शिवाजी गायकवाड वय वर्षं 27 रा. निमगाव वाघा हा फरार होता.
सदर आरोपी हा त्यावेळी महा-ई सेवा केंद्र चालवत असे त्याचा फायदा घेऊन पीक विम्यासाठी शेतकऱ्यांकडून पैसे घेऊन फसवणूक केली होती , तेव्हा पासून फरार झाला होता ,सदर आरोपी लॉक डाउन मध्ये आल्याची माहिती मिळताच , नगर तालुका पोलिस स्टेशन चे
सपोनि राजेंद्र सानप,psi धनराज जारवाल, पोना शिंदे ,पोना मरकड,पोना खेडकर यांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे,
न्यायालयाने आरोपीस दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली असून आजुन किती शेतकऱ्यांची फसवणूक केली त्यांचा तपास सुरू आहे.

