shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

माजी जलसंधारण मंत्री प्रा.डॉ.आ. तानाजीराव सावंत यांचे स्वखर्चाने १००० बेडचे जम्बो कोरोना सेंटर...!



संपूर्ण आरोग्यसेवा मोफत देणारे बार्शी येथील एकमेव कोरोना सेंटर...!

प्रतिनिधी : आसावरी वायकर
बार्शी (दि.६ ) : येथील लोकप्रिय आमदार माजी जलसंधारण मंत्री प्रा.डॉ.आ.तानाजीराव सावंत यांनी कोरोना सारख्या आजाराच्या महामारीच्या काळात गोरगरिब जनतेची जाण ठेवून स्वतःच्या खर्चाने कोरोना बाधित रुग्णांसाठी १००० बेडचे जम्बो कोरोना सेंटर सुरु करत आहेत.

या कोरोना सेंटरचे उद्‌घाटन उद्या दि . ७ मे रोजी होणार असून शिवसेना नेते मा .ना . एकनाथजी शिंदे साहेब नगरविकास मंत्री सार्वजनिक बांधकाम ( सार्व .उपक्रम )मंत्री तसेच शिवसेना सचिव मा. श्री . मिलिंदजी नार्वेकर साहेब स्वीय सहाय्यक मुख्यमंत्री यांचे शुभहस्ते होणार आहे.

या कोरोना सेंटर मध्ये तज्ञ डॉक्टरांची टीम असणार आहे. तसेच संपूर्ण औषध उपचार व एक्स रे मोफत असणार आहे.कोविड च्या वेगवेगळ्या आठ रक्त चाचण्यांची मोफत तपासणी होणार असून नाष्टा जेवण ही मोफत राहणार आहे.कोरोना बाधित रुग्णांसाठी प्रशिक्षित योग शिक्षक ही असणार आहेत.प्रत्येक तीन रुग्णास शक्य आहे तोपर्यंत स्पेशल रूमची सोय करण्यात आली आहे .

हे जम्बो कोरोना सेंटर बार्शी येथील बार्शी-ताड सौंदणे रोड बायपास येथे होणार असल्याचे विकासरत्न प्रा. तानाजीराव सावंत प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्री .रामचंद्र घोगरे सर यांनी सांगितले.
close