shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

करमाळा तालुक्यात किती रुग्णवाहिका आहेत ?.सर्व हाॅस्पिटलच्या बाहेर फलक असावा..!सेवा न दिल्यास परवाना रद्द करा - संजय (बापु) घोलप..!

प्रतिनिधी : आसावरी वायकर

करमाळा (दि.६ ) : तालुक्यात व शहरात कोरोनाबाधित पेशंट ची संख्या दिवसें दिवस वाढत आहे .त्यातच  तालुक्यात कोरोना पेशंट चे ऑक्सिजन कमी होण्याचे प्रमाण वाढत असुन त्यांना पुढील उपचारासाठी बार्शी ,पुणे ,नगर,सोलापुर, कुर्डवाडी, जेथे बेड मिळेल तेथे अचानक उपचारासाठी जावे लागते. सध्या खाजगी गाडीत पाठवायचे असेल तर त्यामध्ये ऑक्सिजन ची सोय नसते.
            संजय घोलप

करमाळा तालुक्यात किती रुग्णवाहिका  आहेत यांची यादी हाॅस्पिटल मध्ये उपलब्ध करून द्यावी  असे निवेदन करमाळा तहसीलदार यांना देणार आहोत असे संजय (बापु) घोलप मनसे तालुका अध्यक्ष यांनी सांगितले . 

 त्यांचे  मोबाईल नंबर जर उपलब्ध झाले तर पेशंटच्या नातेवाईकांना धावपळ करण्याची गरज लागणार नाही . त्यामुळे सोशल मिडिया व शहरातील प्रत्येक हाॅस्पिटल, कोव्हिड सेंटर  येथे करमाळा तालुक्यात असलेल्या रुग्णवाहिका  गाडींची संख्या किती व त्यांचे मोबाईल नंबर गाडीचा नंबर मिळावा व कोणत्याही रुग्णवाहिका  गाडीच्या संबंधीत मालकाने सेवा देण्यासाठी टाळाटाळ केली तर त्यांचा परवाना तत्काळ रद्द करण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना करमाळा च्या वतीने करत आहोत .

त्यांचे कि.मी .चे दर निश्चित करावेत ते सर्व सामान्यांच्या खिशाला परवडणारे असावेत अशी विनंती करणार असल्याचे मनसे तालुकाध्यक्ष संजय घोलप यांनी सांगितले.
close