जनता हीच मायबाप समजुन मायेचा आधार देणारे - मा. जयवंतराव जगताप :-
प्रतिनिधी : आसावरी वायकर
करमाळा (दि.६) :कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमी वर प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी शासनाने कडक निर्बंध लागू केल्याने लॉकडाऊन सदृश्य परिस्थिती निर्माण झाली .
या दरम्यान दैनंदिन मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या व हातावर पोट असणाऱ्या गोरगरीबांची रोजगारा अभावी उपासमारीची शक्यता निर्माण झाली,
जनता हीच आपली मायबाप
समजणारे आणि सामाजिक बांधीलकीचे भान ठेवणारे माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी करमाळा शहरालगतच्या संगोबा रोड येथे पाल ठोकून राहणार्या डवरी गोसावी समाजाच्या गोरगरीब गरजू कुटुंबांना गहू व तांदुळाचे वाटप करून त्यांना आधार दिला.
या वेळी माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे सह युवानेते शंभुराजे जगताप, माजी नगरसेवक सुरेश इंदुरे, दिगंबर रासकर, उद्योजक संतोष गुगळे, खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष जनार्धन नलवडे, संचालक शहाजी शिंगटे, अमोल परदेशी आदी उपस्थित होते .

