shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रुग्णसेवेसाठी झपाटलेला आमदार घरदार विसरून कोवीड सेंटर मध्ये आपल्या सहकारी मीत्रांसमवेत, जमीनीवरच झोपतो ...!



आमदार असावा तर असा, मतदार संघालाच कुटुंब समजणारा..!

हे वेड रक्तातच आसावे लागते ..!

अहमदनगर । प्रतिनिधी :- 
४८ तासाचा दिवस आसला तरी मला वेळ कमीच पडतो हे नेहमी सांगणारे पारनेर नगर विधान सभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे सामान्य आमदार निलेशजी लंके आपल्या साधे पणांमुळे संपुर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय झाले आहेत.

कोरोना विषाणूचा वाढता संसंर्ग लक्षात घेता गत वर्षी कर्जुले हर्या येथे मा.शरदचंद पवार साहेब आरोग्य मंदीर चालु करत करोना काळात किमान सहा हजार गरीब रुग्णांना मदतीचा हात देत एकही रुग्ण न गमवता यशस्वी कोवीड सेंटर चालवीले होते.

 गेल्या वर्षापेक्षा या वर्षी विषाणूचा दाह मोठ्या प्रमाणात असल्यामुळे भाळवणी येथे अकराशे बेडचे सुसज्ज असे मोफत आरोग्य मंदीर चालु करून हाजारो रुग्णांना जिवदान देणारे लोकनेते निलेशजी लंके हे महाराष्ट्रात तरुणाईचा उर्जात्रोत झाले आहेत. महाराष्ट्रा सह देशभरातून व देशाबाहेरीलही लाखो चाहता वर्ग अल्पावधीतच निर्माण करणारे आमदर लंके हे महराष्ट्रातील कदाचीत एकमेव आमदार असावे असा चर्चेचा विषय झाला आहे.


किती हा साधेपणा ...!

गेले अनेक आठवडे रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, आपल्या घरादारा कडे पुर्णपणे दुर्लक्ष करत पुर्ण वेळ हजारो रुग्णांना बेड, व्हेंटिलेटर उपलध्द करून देणे, इंजेक्शन उपलध्द करून गरजू रुग्णांपर्यंत पोहचवीणे, वृद्ध माता पिता तरुण बंधु भगिणींना प्रत्येक बेडवर जात त्यांची तपासणी करणे, त्यांना मायेचा आधार देणे , कोण जेवले नाही , कुणाला काही त्रास होतो का, कुणा वृद्ध आजी- आजोबाच्या सोबत नातेवाईक नसल्यास त्यांच्या मुलाचे कर्तव्य पार पाडणे, तरुण बंधु भगीणींचा भाऊ होणे, चिमुकल्यांचा मामा होणे, मायेचा आधार देत रुग्णांना मानसीक आधार देत त्यांच्यात जिवन जगण्यांची डॉक्टर बणून त्यांच्यात नवीन उर्जा निर्माण करणे, या सर्व भुमीका एकाच वेळी पार पाडणारा अष्टपैलु कलाकार आयुष्याच्या रंगमंचावर वेगवेगळ्या भुमीका पार पडतोय व दिवसाच्या सरते शेवटी रात्री एक ते दिड वाजता ऑक्सीजन कुणाचे कमी झाले, हे सर्व जाणीव पुर्वक पाहुन नंतर कोवीड सेंटर मध्येच जेवण करणे व तेथेच कार्यकर्त्यां समवेत झोपणारा हा आमदार नव्हे तर स्वतःला सामान्य जनतेचा सेवक समजणाऱ्या या लोकनेत्याला महाराष्ट्राची जनता दैवत समजू लागलीय ती फक्त त्यांच्या अंगी आसणाऱ्या साधेपणातील परोपकारी व्यक्तीमत्वामुळेच !


असे जमीनीवरचे लोकनेते प्रत्येक मतदारसंघात तयार झाले तर तर महाराष्ट्र राज्याची अशी दुर्दशा  होईल काय..?
close