shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्री. धनराज विसपुते फौंडेशनच्या वतीने N95 मास्क व सॅनिटायझरचे वाटप..!



राजेश बाष्टे । अलिबाग प्रतिनिधी :-


अलिबाग:- दि. ०४/०५/२०२१ मंगळवार रोजी,शिक्षक परिषद प्राथमिक चे संस्थापक व आमदार मा.श्री. संजयजी केळकर सर यांच्या मार्गदर्शनानुसार व महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, प्राथमिक विभागाचे अध्यक्ष मा. श्री. राजेशजी सुर्वे सर, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचे कार्यवाहक मा.श्री. पुरुषोत्तमजी काळे सर यांच्याशी झालेल्या चर्चे नुसार कोरोनाच्या कालावधीत समाजाचे आधार स्तंभ असणाऱ्या व कोरोनाशी लढणाऱ्या सर्वांसाठी  सामाजिक बांधिलकी जोपासत श्री.धनराज विसपुते फाउंडेशच्या वतीने फाउंडेशनचे अध्यक्ष व आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन  मा. श्री. धनराजजी विसपुते सर यांनी शिक्षक परिषदेचे मा. श्री.सुशील वाघमारे सर यांचे कडे २०० सॅनिटायझर व २०० N95 मास्क सुपूर्द केले सोबत बी. एड कॉलेजचे (पनवेल) प्राचार्य मा. डॉ. सीमा कांबळे व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
close