shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राहुल देशमुख यांची केज उपजिल्हा उपरुग्णालयास औषध सामग्री दान..!!

प्रकाश मुंडे । बीड जिल्हा प्रतिनिधी:- 
सामाजिक जाणीव भान ठेवून कोणत्याही लाभाच्या पदाची अपेक्षा न ठेवता केलेली मदत हि खूप मोठी दानत असते. आणी असे दान  केज येथील श्री राहुल राजेसाहेब देशमुख यांनी दाखवत सरकारी रुग्णालयास औषध सामग्री दान दिली  . 

केज तालुक्यातील अतिशय शांत ,  सालस व सदगुणी असे राहुल  देशमुख हे व्यक्तीमत्व प्रसिद्ध आहेत . त्यांच्या वडिलांनी पण जनसेवा मोठ्या प्रमाणात केली सामाजिक राजकीय व्यक्ती म्हणून त्यांनी केज तालुक्यात खूप मोठे काम केले आहे .    

समृद्ध व चारीत्र्य संपन्न राजकारणात त्यांचे नाव प्रथम क्रमांकाचे आहे . सध्या जरी ते राजकारणापासून अलिप्त असले तरी पहिल्या पासूनच राहुल देशमुख हे राजकारणापासून दुर राहिले परंतु सामाजिक जाणीव मात्र त्यांनी नेहमीच जपली आहे . 

यातच सध्याच्या कोरोना काळात त्यांनी हि जाणीव व्यक्त केली व सध्या जिल्हा उपरुग्णालयास औषध सामग्री ची आवश्यकता लक्षात आली व त्यांनी आवश्यक ती औषध सामग्री उपजिल्हा रुग्णालयास दान दिली . राहुल देशमुख यांनी कोणत्याही राजकीय व लाभाच्या पदाची अपेक्षा नसताना जी मदत केली ती खूप मोठ्या स्वरुपाची आहे .
 
Tab metronidazol 400 mg 3000 ,  मध्यम साईजचे ग्लोज ,  ५० लि सॕनिटायझर , Hydrocort 100 mg injection 100  नग आदी  साहित्य दान दिले.                      

राहुल देशमुख यांच्या कोरोना काळातील या दानत्वाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
close