प्रतिनिधी । स्नेहा उत्तम मडावी :-
पुणे:- लोकप्रिय कार्यसम्राट आमदार तथा अध्यक्ष सार्वजनिक उपक्रम समिती ॲड् श्री अशोक रावसाहेब यांनी..
आज करडे येथील बांदल हॉस्पिटलमध्ये कोविड रुग्ण उपचार घेत असलेल्या वार्ड मध्ये जाऊन रुग्णांची आस्थेने विचारपूस करत त्यांना धीर दिला..
लोकप्रिय आमदार ॲड् श्री अशोक रावसाहेब पवार यांच्या विशेष प्रयत्नातून रावलक्ष्मी ट्रस्ट तर्फे 2 आणि फियाट कंपनीने रावलक्ष्मी ट्रस्टच्या माध्यमातून एक अशा एकूण तीन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन बांदल हॉस्पिटलला देण्यात आल्या आहेत.
राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा भासत असल्यामुळे हवेतून पाच ते आठ लिटर ऑक्सिजन तयार करणारी संबंधित मशीन रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी वरदान ठरत आहे.
अशी माहिती यावेळी डॉक्टरांनी आमदार साहेबांना दिली व ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन दिल्याबद्दल आमदार अशोक बापूंचे आणि रावलक्ष्मी ट्रस्ट तसेच फियाट कंपनीचे आभारही व्यक्त केले.

