प्रतिनिधी । स्नेहा उत्तम मडावी :-
सोलापूर:- टाळेबंदीच्या कालावधीत नवकवींना काव्य सादरणीकरणाची संधी देण्यासाठी साहित्य आनंद यु-ट्यूब चॅनल, सह्याद्री कवी एकसंघ, सोलापूर व काव्यविचार साहित्य मंच परिवार, चंद्रपूर-नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने. साहित्य आनंद यु-ट्युब चॅनल, सोलापूरच्या माध्यमातून नुकतीच राज्यस्तरीय ऑनलाइन काव्यस्पर्धा आयोजित करण्यात आली.
ही काव्यस्पर्धा दोन विभागात संपन्न झाली. पहिल्या विभागात परीक्षकांनी विजेत्यांची निवड केली. दुसर्या विभागात ऑनलाइन साहित्य रसिकांच्या पसंतीनुसार निवड झाली. दोन्ही विभागांत स्वतंत्र प्रथम (रू.- १००१/-), द्वितीय (रू.-७०१/-), तृतीय (रू.-५०१/-), उत्तेजनार्थ (रू.-२५१/-) व पाच उल्लेखनीय कवितांना प्रत्येक रू.-१०१/- प्रमाणे पारितोषिके व ई सन्मानपत्रे देण्यात आली. प्रत्येक सहभागी स्पर्धकांना सहभागी ई-प्रमाणपत्रे देण्यात आली.
दिनांक १ मे महाराष्ट्र दिनादिवशी या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यामध्ये पहिल्या भागात सुजित श्रीमंत काळंगे (सातारा) यांना प्रथम, अनिल शिंदे (जळगाव) यांना द्वितीय, सौ. स्वप्नाली अतुल देशपांडे (नवी मुंबई) यांना तृतीय, विनायक लिंगायत (गडचिरोली) यांना उत्तेजनार्थ तर पाच उल्लेखनीय कवितांची पारितोषिके प्रा. इंद्रजित पाटील (सोलापूर), विजय यशवंत सातपुते (पुणे), मयुर मधुकरराव जोशी (परभणी), सोपान शं. पिंगट (पुणे), सौ. सरोज अंदनकर (नागपूर) यांना जाहीर झाली. ही निवड परीक्षकांनी केली.
कवी रामप्रभू माने
दुसर्या विभागात सौ.अनुसया गणेश उदमले (अहमदनगर) यांना प्रथम, कु. दिपाली नि.मारोटकर (अमरावती) यांना द्वितीय, सौ. सुनिता संतोष उत्तरवार (गडचिरोली) यांना तृतीय, प्रतीक राजू डावरे (सोलापूर) यांना उत्तेजनार्थ तर पाच उल्लेखनीय कवितांची पारितोषिके राजेश मनोहरराव चौधरी (पुणे), कु. ललीता पोचुजी दहागावकर (गडचिरोली), कु. काजल बन्सी चव्हाण (सोलापूर), प्रणाली शंकर टकले (सांगली), नरेश नारायण चव्हाण (पुणे) यांना जाहीर करण्यात आली. यातील निवड रसिकांच्या पसंतीनुसार करण्यात आली.
स्पर्धकांनी कवितेच्या चित्रफिती पाठवणे व त्या यु-ट्यूब वर प्रसारित करून रसिकांची पसंती मिळवणे, व परीक्षकांनी स्वतंत्र निवड करणे अशी या स्पर्धेची कार्यपद्धती होती. रसिकांनीही या स्पर्धेस उदंड असा प्रतिसाद दिला. या काव्यस्पर्धेत महाराष्ट्रातून १८६ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. गुजरात राज्यातूनही काही स्पर्धक सहभागी झाले होते. संयोजक म्हणून मा.कवी राजेंद्र भोसले, मा.कवी रामप्रभू माने, मा.कवयत्री प्रियंका वाकडे-शेंडे, शशिकला गुंजाळ, प्रा. गायकवाड यांनी काम पाहिले तर परीक्षक म्हणून आप्पासाहेब कसबेकर, गिरीश दुनाखे व सौ. वंदना कुलकर्णी यांनी काम पाहिले.

