कोपरगाव । प्रतिनिधी :-
कोपरगांव शहरात सध्या कोरोना संसर्गाचे प्रमाण अधिक वाढत असून शहरात सर्व प्रभागातही सध्या कोरोनाने शिरकाव केल्याचे दिसून येत आहे. दिवसेंदिवस कोरोना चे रुग्ण हि वाढत आहेत. याची खबरदारी उपाय म्हणून कोपरगांव नगरपालिका प्रशासनाने शहरात त्वरित हायपोक्लेराईड औषध फवारणी करावी.
कारण शहरातील मागील एक महिन्यापासुन कोरोना चे रुग्ण वाढीचा उद्रेक झालेला दिसत आहे. यात शंका नाही कारण कोपरगाव शहरात कोरोना रुग्णवाढीची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चालला आहे.अणि त्यामधे रुग्ण दगावण्याचे प्रमाण ही वाढले आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तरी कोपरगाव शहरातील नागरिकांची सुरक्षा म्हणून नगरपालिका प्रशासनाने तातडीने शहरात औषधची फवारणी करावी जेणे करून भविष्यत उद्भवणार्या साथीच्या आजारांना आवर घालन्यास मदत होईल.

