shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जनविकास परिवर्तन आघाडी ठरतेय केजकरांची अन्नदाता..!!

आदर्श व झुंजार पत्रकार संघातील पत्रकारांबरोबरच मजूर व हमालांना ही केले किराणा किटचे वाटप ..!! 


प्रकाश मुंडे  । केज जिल्हा प्रतिनिधी :- 
केज मधील  आदर्श व झुंजार पत्रकार संघातील पत्रकारांना या कोरोनाच्या महामारीमध्ये आपण ही पत्रकारांना काही मदत करावी या हेतूने जनविकास परिवर्तन आघाडीचे सर्वेसर्वा हारून भाई इनामदार यांनी किराणा किटचे वाटप केले व या कोरोना या काळात लोकशाहीचा तिसरा स्तंभ असणाऱ्या पत्रकार बांधव यांच्या बरोबरच मजूर व हमाल यांना किराणा किटचे वाटप करून समाजाचा खरा जाणता असल्याचे दाखवून दिले .



केज मध्ये बरेच  पैशाने कोट्याधीश आहेत पण मनाने कोट्यधीश नाहीत.समाजाची खरी जाणीव हारून इनामदार यांना असल्याचे पुन्हा एकदा दाखवुन दिले .प्रत्येकाच्या आडी अडचणी जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करून त्यांच्या आडी अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करत असतात. कोरोना काळात ही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता समाजासाठी काम करत राहणे माझे कर्तव्य आहे ,असे किट वाटप करत असताना हारून भाई इनामदार यांनी म्हटले आहे.  संपूर्ण केज हे माझे कुटुंब म्हणून मी सेवा करत आहे भले माझ्याकडून फुल नाही फुलाची पाकळी म्हणून मी माझ्या कुटुंबासाठी काही देऊन हातभार लावण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले .
  
माझ्या केज वासीयांसाठी पाण्याचा खूप मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.तो ही माझ्या स्वतःच्या पैश्याने विविध ठिकाणी पाण्यासाठी लागणारे टँकर असो किंवा बोर असेल ते दुरुस्त करून या कोरोना महामारीच्या काळात माझ्या केज वासीयांना पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये म्हणून वेळोवेळी पाण्याची सुविधा उपलब्ध करून देत आहे.


कोरोना काळ हा खूप भयानक काळ आहे या मध्ये माणुसकी या नात्याने फक्त आधार देण्याची गरज आज दिसून येत आहे .ते मी परमेश्वराच्या कृपेने माझ्याकडून होईल तेवढी मदत करण्यास मी सदैव कटिबद्ध असल्याचे सर्व पत्रकार बांधव व उपस्थित मजूर , हमाल यांना सांगितले.

 
केज मध्ये सध्या काही लोक फक्त राजकारणापूरते  बाहेर येतात व अश्या वेळी आपल्या घरात बसतात तसा मी नाही मी या केज वासियासाठी रात्र दिवस एक करून या काळात मदत करायला तयार आहे फक्त या काळात तरी राजकरण न करता आपण समाजासाठी काही देणे लागतो याचा विचार करावा व संपूर्ण केज वासियासाठी लागेल ते मदत करून केज वासीयांना आधार द्यावा.
  

जागतिक पत्रकार दिवसाचे औचित्य साधून कोरोना काळात पत्रकारांना किराणा किटचे वाटप करून एक कौटुंबिक आधार देणाचे महान कार्य  जनविकास आघाडीच्या वतीने हारून भाई इनामदार यांनी केले असे उदगार पत्रकार बांधव यांनी काढले.

कोरोनाच्या काळात सर्व सामान्य जनतेला आधार देण्याची गरज आहे न की कोठे गावाला जाऊन ,घरात बसून जनतेला आधार मिळणार नाही केज वासीयांचे कुटुंब उपाशी राहू नये या साठी माझी जनविकास परिवर्तन आघाडी रात्रदिवस आपल्यासाठी प्रयत्न करेल.
close