shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिर्डी एक्सप्रेस लाईव्ह महिला विशेष !!

प्रमोद चौधरी

जळगाव जिल्हा प्रतिनिधी एरंडोल.

जिल्ह्यात सध्या कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे. राज्यभर लॉकडाउन असून बहुतेक उद्योग धंदे बंद आहेत तर किराणा माल भाजीपाला दुकाने  व इतर दुकाने देखील सकाळी सात ते अकरा  सुरु असल्याने सर्वत्र निरव शांतता पसरली आहे.असे असतानाही महिला पावसाळ्यापूर्वीची कामे करण्यात मग्न असल्याचे दिसून येत आहेत. घरोघरी पारंपरिक पद्धतीचे तिखट , मसाले , कुरवड्या , पापड आदी बनवण्याची लगबग सुरू आहे . पावसाळा अगदी महिन्याभरावर येऊन ठेपला आहे . पाऊस सुरू झाल्यानंतर  खरमरीत पदार्थ बनविण्यास अडचणी येतात म्हणून  ग्रामीण विभागातील महिला मार्च महिन्यापासूनच कडकडित उन्हात हे पदार्थ बनविण्यास सुरुवात करत असतात. घराच्या मोकळ्या जागेत, गच्चीवर, टेरेसवर, जिन्याखाली जागा मिळेल तिथे महिला या कामात मग्न दिसून येत आहेत . आजच्याघडीला उडदाचे व तांदळाचे पापड , खारोड्या कुरवड्या , बटाटा वेफर्स , तांदळाच्या पापड, ज्वारीच्या पापड्  तसेच बटाटा , साबुदाणे वेफर्स हे उपवासाचे पदार्थ पावसाळ्यातील उपवासाला उपयोग पडतात.

 


घरातील सदस्यांना जेवणासोबत पापड , लोणचं ,खारोड्या , कुरवड्या हमखास लागतात आणि त्या विकत आणणे म्हणजे आर्थिक तोटा सहन करावा लागतो. त्यापेक्षा हे पदार्थ घरी बनवणे हेच फायद्याचे ठरते.


गृहिणी,

जोती चौधरी

close