shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

हॉस्पिटलचे बील तपासणी साठी ग्राउंड फिल्डवर काम करणारे मुख्याधिकारी यांची नेमणूक करावी*...संजय (बापु) घोलप..!

प्रतिनिधी : सूर्यकांत होनप
करमाळा : तालुक्यातील कोविड पेशंटच्या खाजगी रुग्णालयातील होणारे बील  यावर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने सहाय्यक निबंधक कार्यालयातील अधिकारी यांची नेमणूक केली आहे. पण यांचा जास्त परिचय व कार्यालय करमाळ्यातील नागरीक व ग्रामीण भागातील बर्याच लोकांना कुठे आहे हेच माहित नाही.करमाळा नगर पालिकेच्या मुख्याधिकारी यांनी गेल्या 2020 मध्ये वर्षभरात कोरोणाचा प्रादुर्भाव चालू झाल्यापासून वर्षापासून या फिल्डवर काम केलेले आहे त्यांना शहरातील नागरिक ओळखतात. त्यामुळे करमाळा नगरपालिकेच्या मुख्याधिकारी सौ वीणा ताई पवार मॅडम यांची नेमणूक करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाप्रमुख संजय ( बापु ) घोलप यांनी मा.तहसीलदार साहेब यांच्या कडे केली आहे.
      
मा.वीणा ताई पवार यांची नेमणूक झाली तर अनेक रूग्णांचे दवाखान्याचे बील कमी होईल आणि जनतेला मदत होईल. जनतेच्या हितासाठी शासनाने लवकरात लवकर निर्णय घेण्याची वीनंती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाप्रमुख संजय (बापु) घोलप यांनी मा. तहसीलदार साहेब यांच्या कडे केली आहे.
close