shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

३१ मे पर्यंत निर्बंध कायम ..? मग शासकीय कार्यालयांत ऑनलाईन उपस्थिती आतातरी करावी...!


प्रतिनिधी : संजय वायकर
अहमदनगर (दि.१३) : कोविड १९ विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने राज्यात लॉक डाऊन ( Break The chain ) ची घोषणा केलेली आहे . त्या अनुशंगाने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये शासकीय निम शासकीय कार्यालये बंद आहेत .केवळ आरोग्य सेवा व ग्रामपंचायती तसेच अत्यावश्यक सेवेचे कार्यालय सुरु आहेत . 



ज्या कार्यालयांना आपली कार्यालये सुरु ठेवायची आहेत त्यांनी केवळ ऑनलाईन पद्धतीने सुरु ठेवली आहेत . आणि सर्व विभाग प्रमुखांना त्यांचे सर्व कर्मचारी यांची उपस्थिती ही ऑनलाईन नोंदविण्यास सांगितले आहे . जिल्हा परिषद यांनी सर्व अधिकारी कर्मचारी यांना मुख्यालयी उपस्थित राहून त्यांचे कार्यालय प्रमुखांच्या संपर्कात राहून व भ्रमणध्वनी सुरु ठेवण्यास सांगितले आहे . आवश्यकता भासल्यास कार्यालयात उपस्थित रहावे तथापि कोणत्याही कारणास्तव संपर्कास प्रतिसाद न दिल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कार्यवाही करावी असे आदेश दिले आहेत .

राज्यभरात वाढत असलेला कोरोनाचा संसर्ग लक्षात घेवून राज्य सरकाने १५ मे पर्यंत असणारी लॉकडाऊन ची मुदत वाढवून ३१ मे पर्यंत केली आहे . परिणामी नगर जिल्ह्यात आतातरी शासकीय कार्यालये ऑनलाईन करावीत .

परंतु अहमदनगर जिल्ह्यामध्ये अजुनही १५ % उपस्थिती  आहे . परिणामी येथील कर्मचाऱ्यांनाही ऑनलाईन पद्धतीनेच काम करण्यास द्यावे आणि उपस्थितीही ऑनलाईन करावी अशी कर्मचाऱ्यांमधून मागणी जोर धरु लागली आहे .

कोवीड १९ विषाणूचा प्रादुर्भाव नगर जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात आहे . येथील जिल्हा परिषद मध्ये या आजाराने कित्येक कर्मचारी व अधिकारी कोरोना बाधित होऊन दगावले आहेत . त्यामुळे कर्मचारी व अधिकाऱ्यांमध्ये घबराटीचे  चिंतेचे वातावरण आहे . 

प्रशासनाने या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून लवकरात लवकर शासकीय कार्यालयांचे काम ऑनलाईन करावे अशी येथील कर्मचाऱ्यांमधून मागणी होत आहे .
close