shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पिंपरी चिंचवड मध्ये पार्थ पवार सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून दापोडी येथे रुग्णवाहिकेचे लोकार्पण..!


पिंपरी चिंचवड:-रूग्णसेवा हीच ईश्वरसेवा हीच ध्येय मनात ठेवून पार्थ पवार सोशल फाऊंडेशन व नगरसेवक राजू बनसोडे यांच्या सौजन्याने प्रभागातील नागरिकांच्या आरोग्याच्या सुविधेच्या दृष्टीने व अत्यावश्यक सेवेसाठी रूग्णवाहिका सेवा उद्घाटन व लोकार्पन सोहळा शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील व विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांच्या हस्ते करण्यात आला.

याप्रसंगी नगरसेविका स्वाती माई काटे, युवासेना विभागप्रमुख निलेश हाके, शहरउपाध्यक्ष शेखर काटे, स्वीकृत सदस्य संजय कणसे, कार्याध्यक्ष जन्नतबी सय्यद, उपाध्यक्ष सुवर्णा काळभोर, प्राजक्ता कांबळे, अजय जाधव, मनोज वाखरे, रवी कांबळे, उपाध्यक्ष फमिदा शेख, सदाशिव रसाळ, गोरख ब्राह्मणे, सद्गुरु काटे सोपान काटे, संभाजी काटे, जालिंदर थोरात, भाऊसाहेब मुकुटमल, जाफर शेख, मधुकर सातपुते, तानाजी डोईफोडे, सचिन शिंदे, ॲलेक्स दास, पाॅल नायर, दिलराज आण्णा हे याप्रसंगी उपस्थित होते.
close