shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यतत्पर नियोजनातून म्युकरमायकोसीस झालेल्या महिला रुग्णाचे तातडीने केली सर्जरी ..!

हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यतत्पर नियोजनातून म्युकरमायकोसीस झालेल्या   महिला रुग्णाचे तातडीने केली सर्जरी ..!!
गोड बोलणाऱ्या व्यक्तीच्या नादात काम करणाऱ्या व्यक्तीची साथ सोडली..मुनीर आतार

इंदापूर प्रतिनिधी:बावडा येथील ४ मे २०२१ रोजी अकलूज येथे रहिना बाळू आतार या महिला रुग्णाची तपासणी केली असता म्युकर मायकोसीस  झाल्याचे स्पष्ट झाल्या नंतर त्याची सर्जरी करण्यासाठी पुणे या ठिकाणी सह्याद्री हॉस्पिटल येथे घेऊन गेल्यानंतर बेड मिळत नसल्याने हातबल अवस्थेत आपल्या जवळच्या व्यक्तींना फोन करून मदत मिळवण्यासाठी प्रयत्न केले असता ते मदत मिळू शकले नाही. परंतु ज्यांचा आपल्याशी कधीही कोणत्याही स्वरूपात मदतीची देवाण-घेवाण नसताना या रुग्णांना बद्दल  कार्यकर्त्याकडून माहिती मिळाली असता स्वतः हर्षवर्धन पाटील यांनी फोन  करून आतार यांची विचारपूस करून  त्यांनी फक्त बेड मिळवून न देता रुग्णास हॉस्पिटल मध्ये दाखल करून घेण्यापासून ते रुग्ण पूर्णपणे बरा होऊन घरी पोहोचण्या पर्यंत रोजच्या रोज संबंधित डॉक्टर आणि रुग्णांच्या नातेवाईक यांना फोन करून रुग्ण बरा होण्यासाठी जे नियोजन केले तसे नियोजन ज्यांनी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून वीस वर्ष ज्या पद्धतीने नियोजन पूर्ण कार्यभार संभाळले असा अनुभव असणारे   हर्षवर्धन पाटील यांच्या नियोजनाची चूनक बावडा येथील आतार कुटुंबीयांना सह्याद्री हॉस्पिटल मध्ये पाहण्यास मिळाली. बावडा येथील रुग्णांच्या मुलाच्या प्रतिक्रियेतून दिसून आले आहे.
सविस्तर वृत्तांत असे की, बावडा येथील रहिना बाळु आतार(वय५०) या रुग्णास कोरोना होऊन बरेच दिवस झाल्यानंतर म्यूकर मायको सेसची लागण झाल्याचे अकलूज येथे निष्पन्न झाल्यानंतर तातडीने त्यावरती सर्जरी करण्यासाठी पुणे या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर पुणे येथील सह्याद्री हॉस्पिटल मध्ये घेऊन गेल्यानंतर याठिकाणी बेड शिल्लक नसल्याचे सांगितल्यानंतर हतबल झालेल्या रुग्ण नातेवाइक म्हणजेच त्यांच्या मुलांनी त्यांच्या जवळच्या व्यक्तींना फोन करून मदत मिळवण्यासाठी प्रयत्न केले. परंतु मदत मिळू शकली नाही. आईच्या जीवन-मरणाचा प्रश्न समोर उभा राहिला होता. अशा वेळी  मुनीर आतारला हतबल अवस्थेत लक्षात आले की,आपण फक्त गोड बोलणाऱ्या व्यक्तीच्या नादात काम करणाऱ्या व्यक्तीची सात सोडून बसलो .ज्यांची आपल्याशी कधीही कोणत्याही स्वरुपात मदतीची देवाण-घेवाण नासणारे राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांना या रुग्णांच्या अडचणी संदर्भात माहिती मिळाल्या नंतर आतार यांना फोन करून त्यांनी तातडीने सह्याद्री हॉस्पिटल मध्ये फोन करून डॉक्टरांना सदर रुग्णास बोलावून घेऊन हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेण्यास सांगितले. संबंधित रुग्णांना वर तातडीने उपचार करून घेण्यास सुरुवात केली. या रुग्णाच्या सर्जरीसाठी लागणाऱ्या सात डॉक्टरांनाही हर्षवर्धन पाटील यांनी स्वतः नियोजन करून यशस्वीरित्या सर्जरी करून घेण्यासाठी योग्य नियोजन केले. या काळात स्वतः हर्षवर्धन पाटील यांनी रोज डॉक्टर  व मुनीर आतार यांना फोन करून रुग्णाची देख भाल संदर्भात  फोन करून नियोजन केले . सदर रुग्ण घरी पोहच होण्यापर्यंत नियोजन करून काळजी घेतली. असा आधार देणारे हर्षवर्धन पाटील यांचे रूप आतार कुटुंबियांना पाहण्यास मिळाले. त्यावेळी मुनीर आतार यांनी हर्षवर्धन पाटील यांचे मनोमन आभार मानले. माजी सहकार व संसदीय कार्य मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यतत्पर ते मुळे आतार कुटुंबातील रहीना बाळु आतार यांच्यावर सर्जरी यशस्वीरित्या करून बरे करता आले. अशी माहिती मुनीर आतार यांनी दिली. हर्षवर्धन पाटील यांच्या नियोजनबद्ध कार्यचे जनतेतून त्यांचे कौतुक होत असल्याचे दिसून येत आहे.
 हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यतत्परतेचे कौतुक करताना बावडा ग्रामपंचायतचे सदस्य  दादासाहेब कांबळे हे प्रतिक्रिया देताना म्हणाले की, हर्षवर्धन पाटील हे सर्वसामान्य व अडीअडचणीच्या काळामध्ये आपल्या कार्यतत्परतेतून  जात-पात पक्षभेद न पाहता मदतीला धावून जाणारे नेतृत्व आहे .त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
close