नगर बाजार समिती चे सभापती घिंगे यांच्या पाठपुराव्याला यश...!
नेप्ती उपबाजार समिती सुरू होणार...!
नगर । प्रतिनिधी (शिवा म्हस्के) :-
जिल्हाधिकारी डॉ.राजेद्र भोसले यांनी बाजार समिती अनलाॅकचे आदेश जारी केले आहेत.त्यानुसार बाजार समितीमध्ये सकाळी ७ ते ११ या वेळेत कांदा विक्री वगळून भाजीपाला फळे शेतीमाल करू विक्री व्यवहार सुरू करता येतील मंगळवार ( दि.२५) में मध्यरात्री १२ वाजल्यापासून हे आदेश लागू होतील.या ठिकाणी अटी शर्ती सह सर्व व्यापारी नोकर वर्ग ,हमाल,मापाडी व कामगार यांची आरटीपीसीआर चाचणी बाजार समितिने करावी व त्यास अनुसरून पास देणेबाबत कार्यवाही करावी.
बाजार समितीचे भाजीपाला खरेदी विक्री व्यवहार ३१ में पर्यंत बंद करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने काढलें होते.तसेच आपल्या अहमदनगर शहरातील
वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन नगर बाजार समिती अहमदनगर जिल्हाधिकारी साहेब व महानगरपालिका आयुक्त गोरे यांच्या आदेशानुसार बाजार समिती बंद करावी लागली होती.आता कोरोना परस्थिती आता आटोक्यात आली आहे.
आणि खरिप हंगामात चालू होणार आहे यांत शेतकरयांना खत बि बियाणे खरदे करण्यासाठी पैसे नसल्याने व्यवहार ठप्प झाले आहे. खरेदी विक्री चालू करण हे अत्यंत महत्त्वाचे आहे. हे बाजार समितीचे अभिलाष घिंगे यांनी जिल्हाधिकारी साहेब, महानगरपालिका आयुक्त गोरे यांच्या सातत्याने पाठपुरावा करत होते बाजार समिती चालु करणं हे किती महत्त्वाचे आहे हे प्रशासनाच्या निर्दशनास आणुन दिल्याने जिल्हाधिकारी साहेब आयुक्त गोरे यांनी बाजार समिती चे व्यवहार सुरळीत करण्यासाठी होकार दिला. हि आनंदीची बाब आहे असे बाजार समितीचे सभापती अभिलाष घिंगे आपल्या भावना व्यक्त केल्या.

