चर्चेचा तपशील मात्र गुलदस्त्यात ...!
प्रतिनिधी । आसावरी वायकर :
करमाळा (दि.२५): महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते ना . बाळासाहेब थोरात यांची नुकतीच माजी आ जयवंतराव जगताप यांनी भेट घेतली .
यावेळी ना .थोरात व माजी आ. जगताप यांच्यात २५ मिनीटे बंद खोलीत चर्चा झाली . या चर्चेचा तपशील जरी समजू शकला नसला तरी ना . थोरात यांनी माजी आ. जयवंतराव जगताप यांना काँग्रेस पक्षाचे सक्रियपणे काम करणे विषयी सूचना करून राज्य शासन व काँग्रेस पक्ष जगताप यांच्या पाठीशी ठामपणे राहील अशी ग्वाही ना. थोरात यांनी दिल्याचे समजते .
यशवंतराव चव्हाण यांचे कारकिर्दीत ना . थोरात यांचे वडील सहकार महर्षि भाऊसाहेब थोरात व माजी आ. जगताप यांचे वडील देशभक्त नामदेवराव जगताप यांचे अतिशय स्नेहाचे व मित्रत्वाचे संबंध होते .

