shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नगराध्यक्ष, सरपंच आणि माजी विद्यार्थ्यांनी केली मा.आ. राजीवजी राजळे कोविड सेंटरला मदत ...!


प्रतिनिधी : संजय वायकर
पाथर्डी (दि.२५) : येथील आदी फाऊंडेशन,पाथर्डी नगरपरिषद व खरेदी विक्री संघ, यांचे विद्यमाने सुरू असलेल्या मा.आ.राजीवजी राजळे कोविड केअर सेंटर  मधील रुग्णांना, पाथर्डीचे नगराध्यक्ष  डॉ .मृत्युंजय गर्जे,यांच्याकडून  मांसाहारी भोजन  देण्यात आले.
 
तसेच कळसपिंप्री चे सरपंच दिगंबर भवार यांच्याकडून बिसलरी पाणी बॉटलचे 10 बॉक्स, 2 बिस्किटचे बॉक्स देण्यात आले. 
एम.निऱ्हाळी विद्यालयाचे 2.एम007 चे 10 वीचे माजी विद्यार्थी शाहिद बागवान, गणेश वाखुरे, महेश दौड, निलेश चव्हाण, अमोल फुंदे, निरंजन आंधळे, रिजवाण शेख यांच्याकडून 2 बिस्किटचे बॉक्स, 5 लिटरचा सॅनिटायझरचा 1 ड्रम, मास्क, व्हिटॅमिन सी टॅबलेट देण्यात आले.
      
 यावेळी   उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, पंचायत समिती सदस्य विष्णुपंत अकोलकर, शहराध्यक्ष अजय भंडारी सर,  नगरसेवक नामदेव मामा लबडे, महेश बोरुडे, डॉ . रमेश हंडाळ, बबनराव बुचकूल, हरिभाऊ कोकाटे, बंडूशेठ पठाडे, बंडूशेठ बोरुडे, पांडुरंग सोनटक्के, जमीर आतर, सुरेश बाबर मामा, नितीन भवार,  अजय साठे, तसेच  पत्रकार  उमेश मोरगावकर,  दादासाहेब येढे सर उपस्थित होते.
close