प्रतिनिधी । आसावरी वायकर :
करमाळा (दि.२५) : तालुक्यातील व शहरातील करोना च्या पार्श्वभूमीवर सध्या लसीकरण करून घेण्यात येत असुन तेथे नागरिकांची खुप गर्दी झालेली दिसुन येत असुन लस नोंदणी करून घेण्यापासून ते लस घेण्यापर्यंत दिवस भर थांबुन ताटकळत उभा राहावे लागत आहे ,व काही जण अपंग ,डोळ्यांनी दिसत नाही , तरं काहींना तर जागेवर उभा पण राहता येत नाही अशी गंभीर अवस्था आहे .
त्यातच लसीचा मुबलक साठा उपलब्ध नसल्यास दुसऱ्या दिवशी परत यावे लागते त्यामुळे दिव्यांग नागरिकांना खुप त्रास होत आहे व ते लसीकरणा पासुन वंचित राहू शकतात,त्यामुळे मा.तहसीलदार साहेब यांनी तालुक्यातील व शहरातील दिव्यांग व्यक्तीचा विचार करून त्यांचे लसीकरण करण्यासाठी वेगळी स्वतंत्र यंत्रणा राबवावी व त्यांना त्यांच्या घरीच लसीकरण मिळावे आजच्या करोना काळात लसीकरण संदर्भात दिव्यांग वर दुर्लक्ष होताना दिसत आहे त्यामुळेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना ,करमाळा च्या वतीने तहसिलदार समीर माने साहेब यांना निवेदन देण्यात आले.
या वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जि.उपाध्यक्ष राजेंद्र मोरे,ता . उपाध्यक्ष, अशोक गोफणे,ता.उपाध्यक्ष मा.राजाभाऊ बागल ,शहर अध्यक्ष नानासाहेब मोरे, जि.म.न.वि से संपर्क अध्यक्ष मा. विजय रोकडे, करमाळा ता.संपर्क अध्यक्ष मा.रामभाऊ जगताप, म.न.वि.से.जि.अध्यक्ष मा.सतिश फंड,जि.उपाध्यक्ष म.न.वि.से मा.आनंद मोरे ,शहर अध्यक्ष म.न.वि.से मा.तेजस राठोड ,शहर अध्यक्ष उद्योजक आघाडी मा.अरीफ पठाण, शहर उपाध्यक्ष मा.रोहित फुटाणे,शहर उपाध्यक्ष मा.अजिंक्य,शहर उपाध्यक्ष मा.सचिन कणसे,किरण,कांबळे,सो.जि.म.न.वि.से प्रसिद्धी प्रमुख मा.महेश डोके मा.अनिल माने योगेश काळे,अमोल जांभळे,राजा कुभांर, विजय हजारे,योगेश काळे,स्वप्निल कवडे उपस्थित होते .

