शिर्डी । प्रतिनिधी : ( तुषार महाजन )
डॉ. गागरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज २५/५/२०२१ रोजी पिंपळवाडी या गावामध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये लस देण्यात आली. सावळीविहीर या PHC खालील जवळपास ७ गावांना ज्या त्या गावात जाऊन लस देण्याचा उपक्रम मागील आठवड्यापासून डॉ. गागरे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. आज PHC मार्फत पिंपळवाडी गावाला प्रथमच लस वितरीत करण्यात आली.
डॉ.गागरे यांच्या मते ज्या गावाचे लसीकरण असेल तेथे जाऊन लस दिली तर कोरोना संसर्गाचा धोका कमी होतो. यामुळे नागरिकांच्या आरोग्याची सुरक्षितता वाढते. यात ६० डोस वितरीत करण्यात आले. पिंपळवाडीतील सर्व ग्रामस्थांनी शांततेमध्ये लस घेतली.
यावेळी पिंपळवाडी गावाचे सरपंच श्री. रामनाथ नानासाहेब तुरकणे, माजी सरपंच श्री.जालिंदर गोरक्षनाथ तुरकणे, माजी पंचायत समिती उपसभापती राहता श्री. दिपक अशोक तुरकणे, ग्रामपंचायत सदस्य विक्रम तुरकणे, श्री गणेश सहकारी साखर कारखाना माजी संचालक श्री. आप्पासाहेब नामदेव तुरकणे, श्री.बबनराव जगन्नाथ सालपुरे आदी उपस्थित होते.

