देहेन मेढेखार येथील पुलाची पहाणी करताना आमदार खासदार
राजेश बाष्टे । अलिबाग प्रतिनिधी:-
रायगड जिल्ह्याचे खासदार मा.सुनील जी तटकरे साहेब अलिबाग विधानसभा मतदार संघाचे आमदार मा.महेंद्र शेठ दळवी यांनी पाडवादेवी देहेन मेढेखार या रस्त्यावर देहेन गावाजवलील ५० वर्षा पूर्वी बांधलेल्या खचलेल्या पुलांची पाहानी करताना व शासकीय अधिकार्यांना पूलाचे काम लवकरच लवकर सुरु करण्याचे आदेश देण्यात आले आहेत तसेच जिल्हा नियोजन फंडातुन निंधी उपलब्ध करून देण्यात येईल असे ग्रामस्थांना सूचित करण्यात आले.
सदर कामांची पाहणी करतांना शिवसेना अलिबाग तालुका प्रमुख राजा केणी शिवसेना उप तालुका प्रमुख प्रकाश पाटील श्रीगाव ग्रामपंचायत सदस्य विकास निळकर सदस्य प्रीती पाटील सदस्य श्रंधा निळकर व ग्रामस्थ ह.भ.प गंगाधर पाटील उल्हास पाटील ह.भ.प प्रेमनाथ राऊत उपस्थितीत होते.

