shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जिल्हाधिकाऱ्यांनी दिले कड़क लॉकडाऊनचे आदेश..!


शहरातील महत्त्वाचे रस्ते केले बंद...!

प्रतिनिधी । संतोष वायकर

करमाळा : (दि.२६) :  तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत  आहे. ते रोखण्यासाठी सरकार वेगवेगळे प्रयत्न करत आहे. शहरा पेक्षा ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या जास्त आहे. ही संख्या कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जिल्ह्यात कड़क लॉकडाउन  जाहीर केला आहे.

 त्याची अंमल बजावणी करण्याचा आदेश दिला आहे. याबरोबर पालकमंत्री दतात्रय भरणे यांनीही रुग्णांची संख्या कमी करण्या साठी योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सुचना केल्या आहेत . यातूनच आता करमाळा शहरातील  काही रस्ते बंद करण्यात आले आहेत. यामुळे गर्दीवर नियंत्रण येणार आहे.

शहरात प्रवेश करणारे काही रस्ते बंद  करण्यात आले आहेत . यामुळे शहरात जाणारी वाहने व गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे. पोथरे नाका येथून मेन रस्ता पुर्नतः बंद करण्यात आला आहे. यामुळे दुचाकी व चारचाकी वाहने शहरात नेता येत नाहीत यामुळे बाहेरच गाडी उभी करून नागरिकांना चालत जावे लागत आहे. याबरोबर शिवाजी महाराज पुतळा येथील दोन्ही रस्ते बंद करण्यात आले आहेत. यामुळे दत्तपेठ व गुजर गल्लीत वाहने नेता येत नाहीत.

करमाळा प्रशासन कोरोना बाधित रुग्णांची संख्या रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्याला नागरिकांनीही सहकार्य करण्याची गरज आहे. तहसीलदार समीर माने , पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, नगरपालिकेच्या मुख्याधिकारी वीणा पवार यांच्यासह राजकिय नेते, सामाजिक कार्यकर्ते , डॉक्टर आपापल्या पध्दतीने कोरोनाला रोखण्यासाठी मदत करत आहे.

लॉक डाऊनमध्ये अत्यावश्यक सुविधा सुरु आहेत. अनेकदा शहरात दुचाकी व चार चाकी गाडयांमुळे वाहतुक कोंडी होऊन गर्दी होत होती मात्र आता  रस्ते बंद केल्याने ही गर्दी होण्यावर नियंत्रण येणार आहे. पोथरे नाका , शिवाजी महाराज पुतळा आदी ठिकाणी बांबू लावून रस्ता बंद केला आहे.
close