नगर । प्रतिनिधी (शिवा म्हस्के):
रुईछत्तीसी उपकेंद्र अंतर्गत येणाऱ्या गावातील "गाव तिथे लस' मोहिम सुरू करण्यात आली आहे. पारगाव मौला या ठिकाणी क्वोलिशिल्ड लसचे १०० डोस उपलब्ध झाले होते. वय वर्षं 45 पुढील नागरिकांना लस देण्यात आली. गाव तिथे लसिकरण मोहिम यशस्वी होत आहे.
याचे समाधान वाटते असे माजी उपसभापती रविंद्र भापकर यांनी "शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह" प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. पारगावात मौला या ठिकाणी सकाळी ९. वाजताच नागरिकांना लस घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. पण या ठिकाणी फक्त १०० डोस दिले जातील असं सांगितलं व जे आधी आलेले ग्रामस्थांना टोकन देण्यात आले. ज्या प्रमाणावर लस चे डोस आले होते. त्या प्रमाणे लसिकरण करण्यात आले.यात पहिला डोस घेणारे काही तर काही दुसरा डोस घेणारे ग्रामस्थ रुईछत्तीसी उपकेंद्रात पहिला डोस घेतलेल्या नागरिकांचा दुसरा डोस आपल्या गावात घेतल्याचे समाधान चेहर्यावर स्पष्ट दिसत होते.
लसिकरण कँप यशस्वी होण्यासाठी माजी उपसभापती रविंद्र भापकर, वैद्यकीय अधिकारी सविता ससाणे,डाॅ.भालसिंग, हिवाळे, बांगर, सुपरवायझर बनसोड,कालेॅ,वाघ,संरपच बोठे, डॉ बोठे, शिवाजी बोठे,अमोल घोडके,आशा सेविका, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, आदी मान्यवरांनी प्रयत्न केले. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.

