shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अहमदनगर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे पत्रकारांकडे साफ साफ दुर्लक्ष..!!

फक्त काम न करता प्रसिद्धी मिळावी ही असते लोकप्रतिनिधींना नेहमी अपेक्षा..!!

पत्रकारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून लोकप्रतिनिधींनी कुठलेच पाऊल उचलले नाही.या बद्दल कमालीची उदासीनता..!! 

अधिकृत पत्रकारांनाही लसीकरण मध्ये प्राधान्य देण्यात आले नाही..!

नगर । प्रतिनिधी :-

नगर तालुक्यातील ग्रामीण शहरी भागातील अधिकृत पत्रकारांचे  तसेच पोलिस बांधवांच्या  कुटुंबीयांना लसिकरणात प्राधान्य देण्यात यावे अशी मागणीच महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाचे नगर तालुका उपाध्यक्ष शिवा म्हस्के यांनी केली आहे.  



संपूर्ण एक वर्ष उलटुन गेले परंतु कोरोना संपण्याच्ं नाव घेत नाही.अशा परस्थितीत पत्रकार व पोलीस आपले कर्तव्य बजावत आहेत. अशा संकटांचा काळात काळात न डगमगता धैर्याने पोलिस, पत्रकार काम करत आहेत.अशा फ्रंन्ट वर्कर म्हणून काम करणार्या घटकाला लस देणे गरजेचे आहे. कोरोना पासून पत्रकार व पोलीस बांधवांचे कुटुंबातील सदस्यांना कोरोना संसर्ग होण्याचा जास्त धोका आहे. पोलिस आणि पत्रकार आपलं काम थांबु शकत नाही.अशा परस्थितीत पत्रकारांना आणि पोलिस कुटुंबातील सदस्यांना लसीकरण मध्ये प्राधान्य देण्यात यावे. 

अशी माफक अपेक्षा ग्रामीण पत्रकार संघटनेची आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या ‌निर्दशनास हि गोष्ट आणुन देण्याचं काम या आधी दैनिक सोशल मीडिया माध्यमातून झाले आहे. ईतर राज्यात पत्रकारांना तातडीने विमा संरक्षण लागु करण्यात आले आहे. या बाबतीत नगर-पारनेर तालुक्याचे आमदार निलेश लंके यांनी देखील मुख्यमंत्री महोदय कडे मागणी केली आहे. तसेच आपल्या महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील या संदर्भात मागणी केली आहे.
पण आज पर्यंत तरी या गोष्टीची दखल ना प्रशासनाने घेतली .?.ना लोकप्रतिनिधी घेतली आहे...?

ग्रामीण भागातील शहरी भागातील अधिकृत पत्रकांराचे लसिकरण होणे गरजेचे आहे.त्या अनुषंगाने यावर  लवकरात लवकर उपाययोजना करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाचे नगर तालुका उपाध्यक्ष शिवा म्हस्के यांनी केली आहे. तरी लोकप्रतिनिधी व प्रशासन नक्कीच सकारात्मक विचार करून पत्रकाार बंधू -भगिनींना दिलासा देतील अशी अपेक्षा बाळगूया....!
close