नगर प्रतिनिधी (शिवा म्हस्के) :
नगर (दि.१३) :-में रोजी नगर तालुक्यातील सारोळाबद्दी येथे पंचायत समितीचे मा.सभापती इंजि.प्रविणदादा कोकाटे यांच्या नियोजनातून वय वर्षां ६० वरील नागरिकांसाठी लसीकरण कॅम्प व रॅपिड अँटीजेन टेस्ट कॅम्प घेण्यात आला.या कॅम्पचे उद्घाटन जि.प.सदस्य संदेशजी कार्ले यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.सांगळे मॅडम,आरोग्य सेवक डेव्हिड वाघमारे हे उपस्थित होते.
हा कॅम्प यशस्वी होण्यासाठी सरपंच सचिन लांडगे,शिवसेना शाखाप्रमुख प्रकाश बोरुडे,उपसरपंच अर्जून हजारे,महेश बोरुडे,ग्रा.प.सदस्य अशोक लांडगे,रंगनाथ शिर्के,जयदीप बोरुडे,प्रदिप डहाणे,ईश्वर बोरुडे,कानिफनाथ ससे,अमोल डाके,ग्रामसेवक एकशिंगे मुख्याध्यापक साठे सर, परिचारिका जाधव ,देठे ,आशा पर्यवेक्षिका साठे मॅडम,आशा सेविका नंदा बोरुडे,अंगणवाडी सेविका,शिक्षक वर्ग व पंचायत समितीचे आरोग्य विभाग कर्मचारी आदींनी प्रयत्न केले.

