-मतदारसंघातील कोरोणाच्या आपत्कालीन परिस्थितीत 50 लक्ष रुपयांचा निधी देणार :आमदार शिंदे
लोहा( प्रतिनिधी):
लोहा व कंधार तालुक्याच्या आरोग्य सेवेमध्ये नव्यानेच समाविष्ट झालेल्या नवीन रुग्णवाहिका या राज्य सरकारच्या एस. डी .आर. एफ( राज्य आपत्कालीन निधीतून) खरेदी करण्यात आल्या असून या नवीन रुग्णवाहिका खरेदी मध्ये केंद्र सरकारची व खासदारांची कोणतीही भूमिका नसून या रुग्ण वाहिका खरेदीला केंद्र सरकार चा निधी मिळाला हे खासदार म्हणतात ,खासदार हे मतदारसंघातील जनतेची दिशाभूल करत असून खासदार हे साफ खोटे बोलत असल्याचे लोहा, कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय , कर्तव्यदक्ष, आमदार शामसुंदर शिंदे यांनी लोहा तहसील कार्यालयामध्ये आयोजित पत्रकार परिषदे मध्ये बोलतांना सांगितले, लोहा येथे नुकत्याच लोकार्पण करण्यात आलेल्या रुग्णवाहिका या राज्य शासनाच्या निधीतून उपलब्ध झाल्या असून या रुग्णवाहिका केंद्र सरकारच्या निधीतून उपलब्ध झाल्या आहेत हे साफ खोटे असून विरोधक फक्त या विषयावर राजकारण करीत असल्याचे पत्रकारांशी बोलताना आ. शिंदे म्हणाले , यातील काही रुग्णवाहिका केंद्र सरकार व खासदार यांच्या निधीतून उपलब्ध झाल्याचे वृत्त माध्यमातून प्रकाशित झाले होते या प्रश्नावर पत्रकारांशी बोलताना आमदार शिंदे म्हणाले की उथळ पाण्याला खळखळाट जास्तीचा असतो,
आजपर्यंत टीकाकारांनी त्यांच्या कार्यकाळात काय दिवे लावले आहेत हे सर्व जनतेस माहित आहे. राजकारण करा पण बिनबुडाच्या वावड्या उठूवू नका मतदारसंघातील जनतेला आता तुमच्यावर तीळ मात्र भरोसा राहिला नसून माझ्यावर उठसूट बिनबुडाच्या टीका करणाऱ्या टीकाकारांना मतदार संघातील जनता चांगल्या प्रकारे ओळखत असल्याचेही आमदार शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, मला उठसूट राजकारण करायचे नाही, कोणावर ही टीका टिपणी करायच्या नाहीत, मला लोहा, कंधार मतदार संघातील जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा, शिक्षण ,रोजगार, दळणवळण, कृषी विकास, व मतदारसंघातील शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास करायचा असल्याचे ही आमदार शिंदे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
या अगोदर कोरोनाच्या संकटात आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या निधीतून कापशी प्रा आ केंद्र ,लोहा व कंधार येथे 32 लक्ष रुपयांचा निधी रुग्ण वाहिक खरेदीसाठी आमदार शिंदे यांनी दिला होता, लोहा तहसील कार्यालयामध्ये आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते राष्ट्रीय सामाजिक कुटुंब अर्थसहाय्य योजनेतील 28 लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप करण्यात आले, यावेळी तहसीलदार विठ्ठल परळीकर , गटविकास अधिकारी जोंधळे , जिल्हा नियोजन समिती सदस्य रावसाहेब पाटील शिंदे ,जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील , लोहा खरेदी विक्री संघ उपसभापती श्याम अण्णा पवार,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण मुंडे, पोलीस निरीक्षक संतोष तांबे सह प्रमुख विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
लोहा, कंधार मतदार संघाला कोरोणाच्या आपत्कालीन परिस्थितीत आमदार निधीतून 50 लक्ष रुपयांचा निधी लवकरच दिल्या जाणार असून, या 50 लक्ष रुपये निधीतून ऑक्सिजन, अधिकचे बेड, व्हेंटिलेटर , व कोरोना वर नियंत्रण मिळविण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक बाबी साठीचा हा 50 लक्ष रुपये निधी मतदारसंघात खर्च केला जाणार असल्याचे ही आमदार शिंदे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले, मतदारसंघातील शेतकऱ्यांना पीक विमा व अतिवृष्टीची मदत लवकरच मिळणार असून आमदार शिंदे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना पिक विमा व अतिवृष्टीची मदत पेरणी अगोदर शेतकऱ्यांना मिळण्यासाठी अधिकाऱ्यांना यावेळी सूचना केल्या,डेरला लिफ्टमधून आंबे सांगवी गावाला पाणी पाळी मिळण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी बोलणे झाले असून आंबे सांगवी ला पाणी सोडण्याची कार्यवाही लवकरच सुरू होईल असेही आमदार शिंदे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.यावेळी योगेश नंदनवनकर,सुधाकर सातपुते,सतीश कराळे,नागेश खांबेगावकर,सिद्धू वडजे,प्रसाद जाधव,शुभम कदम,चेतन पवार,सचिन कल्याणकर उपस्थित होते.

